चोपड्याचा "धरतीधन संघ" ठरला गुर्जर प्रीमियर लीगचा विजेता...सामनावीर ठरले नंदकिशोर देशमुख

 चोपड्याचा "धरतीधन संघ" ठरला गुर्जर प्रीमियर लीगचा विजेता...सामनावीर ठरले नंदकिशोर देशमुख

जळगाव दि.१७(प्रतिनिधी):सकल गुर्जर समाजातर्फे जळगांव येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठानच्या मैदानावर.. जिल्हास्तरीय आयोजित गुर्जर प्रीमियर लीगच्या पाचव्या हंगामाचे विजेतेपद चोपडा येथील 'धरतीधन' हा संघ ठरला. तर उपविजेता म्हणुन ठरला 'त्रिमूर्ती' संघ.'धरतीधन' संघाने 'त्रिमूर्ती' या संघावर ८४ धावांनी विजय मिळवत विजेतापद मिळवले.सदरच्या क्रिकेट सामन्यामध्ये ३० चेंडू खेडून ६१ धावा घेणारे, 'धरतीधन' संघाचे नंदकिशोर देशमुख हे सामनावीर ठरले.धरतीधन या संघाने १० षटकात एकूण ११९ धावा केल्या, सदर लक्षाचा पाठलाग करतांना त्रिमूर्ती संघ केवळ ३५ धावावर गारद झाला.विजेतेपद, सामनावीर व उपविजेता यांना.. पालकमंत्री-गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक-नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते चषक तथा पारितोषिक वितरीत करण्यात आले.


सदर गुर्जर प्रीमियर लिगसाठी, त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट चे संचालक-प्रा.मनोज पाटील, माजी नगरसेवक-डॉ.चंद्रशेखर पाटील, यांचे अनमोल सहकार्य लाभले.स्पर्धेत सर्वाधिक धावा 'त्रिमूर्ती' संघाचे कर्णधार-स्वप्नील पाटील यांनी केल्या, तर सर्वाधिक गडी बाद, स्वराज्य अँटो संघाचे गोलंदाज-दिपक पाटील यांनी केलेत.संघामध्ये कर्णधार-शशांक पाटील, उप कर्णधार-यश पाटील, किरण पाटील, शत्रुघ्न पाटील, नंदकिशोर देशमुख, संदीप पाटील, भगवान पाटील, जितेंद्र पाटील, सुरज देशमुख, साहिल पाटील, गोलु देशमुख, हर्षवर्धन चौधरी, क्रिश पाटील,  मयुर पाटील, गजानन पाटील, आदी सर्व खेळाडू यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने