डॉ. नागेश चव्हाण यांच्या रुग्णसेवेचे फळ राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्याचा सन्मान

 

डॉ. नागेश चव्हाण यांच्या रुग्णसेवेचे फळ राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्याचा सन्मान

♦️राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ताज हॉटेलमध्ये नवभारत शिल्पकार पुरस्काराने डॉ. नागेश* *चव्हाण सन्मानित

♦️रुग्णसेवेच्या सुकाणुधारी डॉ. नागेश चव्हाणांचा राजधाणीत झाला गौरव

जळगाव दि.१६(प्रतिनिधी ):नेहमी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा म्हणून कायम रुग्णसेवेत राहून जनसामान्यांचे आरोग्य सदृढ आणि सक्षम ठेवण्यासाठी अहोरात्र काम केल्याबद्दल नवभारत समुहाकडून त्यांच्या सक्ष आणि दक्ष रुग्णसेवेच्या सुकाणुधारी असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथील ताजमहाल हॉटेलमध्ये नवभारत शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. नागेश चव्हाण यांनी आपल्या रुग्णसेवेच्या काळात आतापर्यंत राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत यशस्वीरित्या सव्वा लाख शस्त्रक्रिया करण्याचे विक्रम केले आहे. त्याचबरोबर किल्लारी येथे झालेल्या भुकंप दरम्यान दहा दिवस अहोरात्र तेथील जनसामान्यांना वाचविण्यासाठी काम करत उत्तम आरोग्यसेवा केली. कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सालिंबा आणि मामला येथे प्लेग सदृक्ष रुग्ण आढळल्यानंतर तब्बल पाच वर्षे गावामध्ये जावून रूग्णांला ग्रेट सेवा देण्याचे काम त्यांनी  केले होते. तर २०१७ ते २०२२ दरम्यान जळगाव येथे सिव्हील सर्जन असतांना बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय कार्यक्रमात जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर रेड झोनमधून जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकामध्येक मनपरिवर्तन केल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आणला होता. यामुळे तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथ बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते त्यावेळी सन्मान करत कौतुक केले होते. या सर्व उत्कृष्ट कार्याची नवभारत समुहाकडून दखल घेत त्यांच्या कार्यावर आढावा टाकत त्याच्या ग्रेट कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि राज्याच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये दि. १३ जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवभारत शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. नागेश चव्हाण यांनी सतत केलेल्या रुग्णसेवेचे हे फळ असून राज्यपालांच्या हस्ते हा जिल्ह्याचा सन्मान झालेला आहे.

डॉ. नागेश चव्हाण कर्तव्यदक्ष अधिकारी 

बीडचे भूमिपुत्र असलेले डॉ. नागेश चव्हाण हे बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करत होते. त्यानंतर बीडलाच आरएमओ व शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यानंतर त्यांना पदोन्नती देवून जळगाव येथे शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी कोविडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केली. त्या काळात त्यांच्यावर काही आरोपही लावण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी कोविड खर्च संदर्भात तक्रारी झालेल्या होत्या. त्यातून भ्रष्टाचार करणारे बाजूला झाले व कर्तव्यावर दक्ष राहून काम करणाऱ्यांच्या अंगलट आले. असेच काही डॉ. नागेश चव्हाण यांच्यासोबतही झाले असावे. कारण की नागेश चव्हाण कधीही स्वतःची चूक मान्य करून कार्य करणारे अधिकारी आहेत. स्वत:कडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करून आपले काम सुरळीत करणे ही डॉ. नागेश चव्हाण यांची स्पेशालिटी असल्याने ते नेहमी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने