चोपड्यात १९ ते २२दरम्यान भव्य रोटरी उत्साह.. दिग्गजांची उपस्थिती

 चोपड्यात १९ ते २२दरम्यान भव्य रोटरी उत्साह.. दिग्गजांची उपस्थिती 

चोपडा दि.१६(प्रतिनिधी):चोपडा रोटरी क्लबतर्फे दिनांक १९ ते २२ जानेवारी दरम्यान सायंकाळी ५ वाजता  खान्देश प्रेस, कोर्टाजवळ, हरेश्वर मंदिर रोड, चोपडा येथे भव्य रोटरी उत्सव २०२४ चे आयोजन  करण्यात आले आहे 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. अरुणभाई गुजराथी (माजी अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य) हे भूषविणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन रोटे. सौ. आशा वेणुगोपाल , आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद   ,जैन इरीगेशन सिस्टीम्स लि. चे चेअरमन श्री. अशोकभाऊ यांची  खास  उपस्थिती लाभणार आहे तसेच विशेष अतिथी  म्हणून रोटे. डॉ. श्री. राहुल मयूर , रोटे. श्री. महेश मोकळकर (माजी प्रांतपाल,  रोटे. श्री. राजेंद्र भामरे (माजी प्रांतपाल),रोटे. श्री. रमेश मेहेर (माजी प्रांतपाल,),डॉ. श्री. निर्मल टाटीया (संचालक, आनंदराज गृप),श्री. मांगीलाल सौंदाणकर (धुळे) हे उपस्थित राहणार आहेत. 

तरी कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रोटे. चेतन टाटीया (अध्यक्ष),रोटे. अर्पित अग्रवाल मानद (सचिव),रोटे. बी. एस. पवार ( सह प्रकल्प प्रमुख),रोटे. अरुण सपकाळे (सह प्रकल्प प्रमुख)रोटे. प्रा. डॉ. ईश्वर सौंदाणकर (प्रकल्प प्रमुख),रोटे. अविनाश पाटील (सह प्रकल्प प्रमुख),रोटे. विपुल छाजेड (सह प्रकल्प प्रमुख) व सर्व सदस्य यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने