कोळी जमातीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..

 कोळी जमातीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन सादर..

*चोपडा दि.२०(प्रतिनिधी):-* शासन व प्रशासन आदिवासी विकास विभागाला पाठीशी घालून कोळी जमातींवर अन्याय करून संविधानिक अधिकार हक्क व लाभांपासून कायमचे वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. म्हणून मंगळवार, २३ जानेवारी २०२४ पासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर कोळी जमातीतर्फे राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतचे अति संवेदनशील निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात इंग्रजकालीन गॅजेटीयर्स, घटनेतील तरतुदी, न्यायालयीन आदेश, शासनाचे निर्णय, प्रशासकीय बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सखोल अभ्यास करून सात दिवसाच्या आत शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करावा, असेही नमूद केलेले आहे.

          प्रारंभी पद्मालय विश्रामगृह येथे माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी केले. क्रांतिकारी प्रवचनकार भरत महाराज सपकाळे, ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, अभ्यासक गुलाबराव बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजसेविका सौ.मंदाताई सोनवणे, डॉ. शंकरलाल सोनवणे, नगरसेवक भरत सपकाळे, बांभोरीचे सरपंच भिकनराव नन्नवरे, अनिल कोळी, दिलीप शंकर कोळी, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, बबलु कोळी, सामा. कार्यकर्ते जगदीश सोनवणे, गणेश बाविस्कर, शोभा कोळी, सौ. सुनंदा कोळी, रोहन सोनवणे, भरत सपकाळे, रवींद्र बाविस्कर, नारायण सपकाळे, सागर सोनवणे, शैलेंद्र सपकाळे, संजय बाविस्कर, अरुण कोळी, समाधान नन्नवरे, बापू ठाकरे, पंकज सपकाळे, रवींद्र सोनवणे, रामचंद्र सोनवणे, गोकुळ सूर्यवंशी, दशरथ जाधव, रवींद्र पाटील, नेहरू शेवरे, अशोक महाले, वैभवराज बाविस्कर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन युवाप्रेरक जगदीशकुमार सोनवणे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने