२२रोजी व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवण्याचे व्यापारी महामंडळाचे आवाहन..

२२ रोजी व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवण्याचे व्यापारी महामंडळाचे आवाहन..




चोपडा दि.२०(प्रतिनिधी )  येत्या 22 तारखेला अयोध्या धाम येथे प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्या अनुषंगानेअयोध्या धाम येथील प्रतिष्ठेचा सोहळा दूरदर्शनवर लाईव्ह दाखवण्यात येत असल्याने  चोपडा शहरातील व्यापारी बांधवांनी  सदरील सोहळा आपल्या परिवारासोबत बघण्यासाठी व जल्लोष साजरा करण्यासाठी आपला व्यापार व्यवसाय दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवावे असे आवाहन चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे कार्य अध्यक्ष सुनिलभाई बरडिया व सर्व पदाधिकारी कडून करण्यात आले आहे

तसेच व्यापारी महामंडळातर्फे मेन रोडवर नवल प्रोव्हिजन समोरील जागेत भगवान श्रीराम!चे स्टेज  उभारून मेनरोडवर विद्युत रोषणाई करून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे व बुंदी प्रसाद चे वाटप  श्री करसनदास नानजी मिठाईवाले याचा कडुन करण्यात येत असून प्रसाद  ग्रहणासाठी  सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे 

 संध्याकाळी सात वाजेला राम लल्ला महाआरती* आयोजित करण्यात आली असून महाआरती चे मानकरी रसिकभाई खिलोसीया, घन:श्यामजी अग्रवाल, नरेंद्र आबा पाटिल, चंद्रहासभाई गुजराथी ,तिलकभाई शाह, संदिपभैया पाटिल,अमृतभाई सचदेव,अनिलभाऊ वानखेडे,पंकजभैय्या बोरोले हे मान्यवरांचे हस्ते होणार आहे

तरी  सर्व राम भक्तांनी सर्व संचालक मंडळचे सदस्य, सर्व व्यापारी बंधू भगिनींनी महाआरतीस उपस्थिती द्यावी ही विनंती सुनील बरडीया(कार्याध्यक्ष),दीपक राखेचा (वरिष्ठ उपाध्यक्ष)प्रवीण राखेचा* (सरचिटणीस)सर्व वरिष्ठ मार्गदर्शक ,सल्लागार, उपाध्यक्ष सहसचिव प्रसिद्धीप्रमुख व संचालक मंडळाने केली आहे 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने