राज्यस्तरीय पोस्टर चित्रकलेचे सागर नाथबुवास बक्षीस

 राज्यस्तरीय  पोस्टर चित्रकलेचे सागर नाथबुवास बक्षीस

चोपडा दि.२१(प्रतिनिधी)- भगिनी मंडळ चोपडा संचलित, ललित कला केंद्र,चोपडा येथील प्रथम वर्ष विभागातील सागर राजेंद्र नाथबुवा यास राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा 2023 चे तृतीय क्रमांकाचे बक्षीस, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख दोन हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.

ही स्पर्धा *मानवी मूल्यांचा पैगाम या राष्ट्रीय मासिक नवी दिल्ली आणि सप्तपुत ललित कला भवन खिरोदा जिल्हा जळगाव* यांच्या संयुक्त विद्यामानाने 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त पोस्ट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत चोपडा येथील ललित कला केंद्रातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण राज्यातून किमान साडेतीनशे चित्रे आली होती. यापैकी सागर राजेंद्र नाथबुवा यास  तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले त्या कारणास्तव प्राचार्य सुनील बारी,प्रा. विनोद पाटील, प्रा संजय नेवे, संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ. पूनमबेन गुजराथी, सहसचिव सौ. अश्विनी गुजराथी, उपप्राचार्य आशिष गुजराथी, श्री. राजेंद्र नाईक सर अंमळनेर तसेच संस्थेचे सर्व प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सागरचे कौतुकाने अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने