आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात..

 आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात..


चोपडा,दि.२३ (प्रतिनिधी):- आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक न्याय व हक्कांसाठी मंगळवार, दि.२३ जानेवारी २०२४ पासुन आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक एडवोकेट शरदचंद्र जाधव पुणे, प्रभारी अध्यक्ष आयोजक सखाराम बिऱ्हाडे संभाजीनगर, राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह ठिय्या आंदोलन साखळी उपोषण धरणे आंदोलन रास्तारोको आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यानुसार जळगाव येथील जी.एस.ग्राऊंडवर सुध्दा उपोषणाला सुरुवात झाली आहे.

       याप्रसंगी ४ जानेवारी पासूनचे उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी भोकर, २३ जानेवारी पासुनचे उपोषणकर्ते पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक लकीचंद बाविस्कर, मंदाताई सोनवणे, मंगला सोनवणे, एकनाथ कोळी, एडवोकेट महेश भोकरीकर, सुभाष सोनवणे, सुनील बाविस्कर, सतीश कोळी, वसंत कोळी, सचिन सपकाळे, लीलाधर सपकाळे, दिलीप शंकर कोळी, सुभाष सोनवणे, मंगेश कोळी, रवींद्र बाविस्कर, भिकनराव नन्नवरे, समाधान नन्नवरे, अनिल कोळी, बबलु कोळी, धनराज नन्नवरे, संजय नन्नवरे, आशाताई सपकाळे, सुनील मोरे, अजय कोळी, नेहरू शेवरे, धर्मेंद्र कोळी, अजय कोळी, अशोक महाले, संभाजी शेवरे, गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र पाटील, अनिलभाऊ कोळी, जितेंद्र सोनवणे, संदीप बाविस्कर, भरत सपकाळे, सरला महाले, ललिता कोळी, आशा कोळी, शोभाताई कोळी, सुभाष सपकाळे, उमेश कोळी, राहुल कोळी, गणेश कोळी, किरण कोळी, विशाल कोळी, एकनाथ कोळी, सुधाकर वानखेडे, योगेश्वर कोळी, सरला कोळी, पंढरीनाथ कोळी, वैभवराज बाविस्कर यांचेसह जिल्ह्यातील शेकडों समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने