हरताळकर हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटरचा आज उद्घाटन समारंभ

 हरताळकर हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटरचा आज उद्घाटन समारंभ

चोपडा दि.२३(प्रतिनिधी)माधवराव गोळवलकर रक्तपेढी व हरताळकर हॉस्पिटल, चोपडा यांच्या सयुक्त विद्यमाने...बुधवारी, दिनांक २४/१/२०२४ रोजी दुपारी ४:३० वाजताहरताळकर हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विकास हरताळकर (संचालक, हरताळकर हॉस्पिटल, चोपडा) हे भूषविणार असून उद्घाटन डॉ. भरतदादा अमळकर (अध्यक्ष, केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगांव) यांच्या शुभहस्ते होत आहे यावेळी प्रमुख पाहुणेश्री. दिलीप चोपडा (कोषाध्यक्ष, केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगांव),श्री. शरद कोत्तावार (प्रकल्प प्रमुख, गोळवलकर ब्लड बँक, जळगांव),डॉ. प्रेमचंद महाजन (पॅथॉलॉजिस्ट, कुलदिप पॅथॉलॉजी लॅब, चोपडा)हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. विनीत हरताळकर,

श्रीमती राधा हरताळकर,डॉ. अमित हरताळकर,डॉ. नीता हरताळकर,सौ. ज्योस्ना हरताळकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने