धुपे ,विचखेडा ,चहार्डी व अडावद येथील युवकांचा शिवसेना (शिंदे)गटात प्रवेश..आ.सौ.लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास

 धुपे ,विचखेडा ,चहार्डी व अडावद येथील युवकांचा शिवसेना (शिंदे)गटात  प्रवेश..आ.सौ.लताताई सोनवणे यांच्या  नेतृत्वावर  विश्वास     


चोपडा दि.३०(प्रतिनिधी ):  चोपडा तालुक्यातील  धुपे, विचखेडा चहार्डी ,अडावद येथील युवकांनी  लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा आणणारे माजी आमदार आण्णासाहेबांचे विचारांनी प्रेरीत होवुन युवकांचा मोठा गट शिवसेनेत (शिंदे गटात)दाखल झाला आहे.याप्रंसगी कृउबा सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, रावसाहेब पाटील, शिवराज पाटील तसेच राजेंद्र पाटील ,महीला आघाडी ता.प्रमुख सौ.मंगलाताई पाटील, माजी संरपच सौ. भावना माळी ,प्रकाश राजपुत नगरसेवक ,अशपाक दादा ,प्रताप पाटील ,प्रेमराज पाटील ,मंगल इंगळे ,जितु कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने