चोपडा मतदार संघात "आँखो देखा हाल अन् सर्व प्रॉब्लेम् स्वॉल्व".. आमदार सोनवणे दाम्पत्याच्या दमदार कार्याने रस्ते ,वीज व पाणी अडचणींचे ताबडतोब फिरले व्हॉल्व..!

 चोपडा मतदार संघात "आँखो देखा हाल अन् सर्व प्रॉब्लेम् स्वॉल्व".. आमदार सोनवणे दाम्पत्याच्या  दमदार कार्याने रस्ते ,वीज व पाणी अडचणींचे ताबडतोब फिरले व्हॉल्व..! 

 चोपडा दि.३१(प्रतिनिधी):- चोपडा मतदार संघांचे रुप कधी नव्हे एव्हढे पालटल्याने आता युवा वर्गाचे मनही पालटू लागले आहे.गेल्या काळात नुसता जातीयतेच्या बुरखा घालून वावरणारे नेते संपण्यात  जमा असून जागरूक नागरिकांनी आता सत्याची चव चाखायला सुरूवात केली आहे.तालुक्यातील भरगच्च विकास उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळत असल्याने "आँखो देखा हाल अन् सर्व प्राॉब्लेम स्वाॕल" अशी स्थिती अनुभवायला येत आहे .जन सामान्यांचा कैवारी म्हणून माजी आमदार प्रा. चंद्रकांत  सोनवणे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील बहुतांश विजेते लोकनियुक्त सरपंच सदस्य यांनी तोबा गर्दी करीत  आमदार सौ.लताताई सोनवणे व  माजी आ.प्रा. अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करुन विकासाची कास धरली आहे.

गावातील विकास साधण्यासाठी ताईसाहेबासारखे व  अण्णासाहेबांसारखे कुशाग्र बुद्धीचे व्यक्तीमत्व भेटणे म्हणजे गावाचा कायापालट होणे ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे हेरून  अनेकांनी अण्णासाहेबांचे बोट धरले आहे. कोटी कोटींचे विकास कामे ही काही थट्टा मस्करी नसून दमबाज नेतृत्वाची धमक असल्याचे जनतेने ओळखले आहे.एरव्ही साधा शिपाई जनतेच्या थातुरमातुर कामाची दखल घेत नव्हता आता मात्र चक्क अधिकारी जनतेच्या कामाची दखल घेऊ लागले आहेत.त्याला कारणही तसंच आहे ,ते म्हणजे ..शांत स्वभाव कुशाग्र बुध्दी अन् चुकलेल्याला  वठणीवर आणण्याचा दमदार आवाज मतदार संघाला लाभला आहे.एव्हढेच नाही आमदारीचे लेबल बाजूला सारून  योग्य अधिकार वापरून योग्य काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मांडीला मांडी लावून ज्येष्ठ श्रेष्ठ न पाहता आपण सर्व एक आहोंत ची माया देण्याची उबही त्यांच्यात आहे. आता तर चोपड्यात औद्योगिक वसाहतीची कुवत मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे . त्यामुळे युवा वर्ग कमालीचा सुखावला आहे.त्याचे पडसाद म्हणून विचखेडा धुपे, चहार्डी ,अडावद,वडती भागातील युवकांनी प्रा.सोनवणे यांच्या कर्तृत्वाला पसंती देत शिवसेनेचा बंध गळ्यात टाकला आहे. एकंदरीत सारासार विचार केला तर चोपडा मतदार संघातील होणारे झंझावाती विकास कामांनी तालुका न्हाऊन निघाला असल्याचे मत जनतेसह विरोधक ही मानू लागले आहेत.बोलत नाही पण डोलत नक्कीच आहेत. गेल्या तीन तपात एवढा मोठा बदल पाहावयास मिळाला नाही एवढा  मोठा बदल  ह्या १० वर्षात  पाहावयास मिळाल्याने  आता लोकलचा नाही तर तुफानी एक्स्प्रेसमध्ये बसल्याचा अनुभव जनतेला होत आहे. याच कारणाने युवकांचे झुंड च्या झुंड शिवसेना तंबूत दाखल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यात अजून अनेक रंग भरले जातील अन् महाराष्ट्राच्या नकाशात चोपड्याचे स्थान अव्वलमध्ये राहिलं असा अनुमान जाणकारांनी वर्तविला आहे.एकंदरीत चोपडा विधानसभा मतदारसंघात विकास कामांचे चौकार व षटकार मारत असल्याने मतदारसंघातील ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने