चोपडा भाजपा तालुकाउपाध्यक्ष पदी भरत पाटीलांची नियुक्ती

 

चोपडा भाजपा तालुकाउपाध्यक्ष पदी भरत पाटीलांची नियुक्ती

चोपडा दि.१(प्रतिनिधी):तालुक्यातील विचखेडा येथील रहिवासी श्री  भरत गुलाबराव पाटील  यांची भारतीय जनता पार्टीच्या चोपड़ा तालुका ग्रामीण मंडळाच्या  उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.ही नियुक्ती तालुका अध्यक्ष चंद्रशेखरजी पाटील यांनी  केली असून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून  यापूर्वी अनेक जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळल्या असल्याने  त्यांना उपरोक्त कामगिरी सोपविण्यात आली आहे.
देशाचे  प्रधानमंत्री  श्री नरेंद्रजी मोदी ,राष्ट्रीय अध्यक्ष  श्री जे.पी नड्डाजी यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  श्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री  ना श्री गिरीश भाऊ महाजन व जळगाव पूर्व यांच्या आशीर्वादाने जिल्हाध्यक्ष  अमोलभाऊ हरिभाऊ जावळे, चोपड़ा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंदजी सैंदाणे चोपड़ा ग्रामीण मंडळ यांनी पक्ष बळकटीसाठी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याचे पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे
या निवडीबद्दल राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री मा.ना गिरीषभाऊ महाजन प्रदेश महामंत्री  श्री. विजयभाऊ चौधरी प्रदेश मुख्यालय प्रभारी श्री.रवीजी अनासपुरे ,खा. रक्षाताई खडसे प्रदेश उपाध्यक्षा माजी आ.श्रीमती स्मिताताई वाघ प्रदेश सचिव श्री. अजय भोळे लोकसभा निवडणूक प्रमुख  श्री नंदकिशोर महाजन यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या असून आत्माराम म्हाळके, रोहीत निकम, प्रकाश ( पप्पु ) पाटील, प्रदीप पाटील, पंकज पाटील, भरत पाटील, धर्मादास पाटील, विजय बाविस्कर,मगन बाविस्कर डॉ .विक्की सनेर मिलिंद पाटील,बबन पाटील, राकेश पाटील, धनंजय पाटील, कांतीलाल पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने