उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शिवकृपा कॉटस्पिन उ‌द्घाटन समारोह

 

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शिवकृपा कॉटस्पिन  उ‌द्घाटन समारोह

चोपडा दि.३१(प्रतिनिधी)येथे शुक्रवार, दिनांक २/२/२०२४, रोजी दुपारी २:३० वाजता शिवकृपा कॉटस्पिन उद्योगाचा विस्तारीत प्रकल्पाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री ना.श्री. अजितदादा पवार (, वित्त व नियोजन मंत्री, म.रा.) यांच्या शुभ हस्ते होत असून पालकमंत्री ना.श्री. गुलाबरावजी पाटील( पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, म.रा.)  हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत .
यावेळी ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (ग्राम विकास व पंचायतराज व पर्यटन मंत्री, म.रा.) ,ना.श्री. अनिलदादा पाटील (मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, म.रा.)यांची खास विशेष उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे  ,खासदार श्री. उन्मेशदादा पाटील,श्री. एम. शंकरजी (डायरेक्टर, लक्ष्मी मशिन वक्र्स, कोईम्बतूर),आमदार श्री. चिमणराव आबा पाटील ,आमदारश्री सुरेशजी भोळे (राजुमामा),आमदार
श्री. किशोर आप्पा पाटिल, आमदार श्री. संजयजी सावकारे ,आमदार सौ. लताताई सोनवणे, आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण ,आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील ,माजी आमदार,प्रा. चंद्रकांतअण्णा सोनवणे , श्रीमती मॅरीजी धनपाल
(जी.एम. एन. डब्ल्यू-२) स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई),श्री. प्रदिपजी रॉय(हेड-टि.एम.डी.) यु.एम.पी.ई.एस.एल., कोईम्बतूर), श्री. श्रीकांतजी गजबी(सेल्स डायरेक्टर, बॅडेवेल सॅव्हीओ, इंडिया) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी  कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
एक्सिक्यूटीव्ह डायरेक्टर, घनःश्याम अग्रवाल चेअरमन आशिष अग्रवाल ,व्हाईस चेअरमन करणअग्रवाल,एक्सिक्यूटीव्ह डायरेक्टरआदित्यअग्रवाल, मॅनेजिंग डायरेक्टर
सुनिल अग्रवाल  यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने