गणपूर येथे कलश यात्रेत गावकऱ्यांचा उत्साह शिगेला

 गणपूर येथे कलश यात्रेत गावकऱ्यांचा उत्साह शिगेला        

 

 गणपूर(ता चोपडा)ता २३(प्रतिनिधी) : येथे अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम प्रतिमा कलश यात्रा काढण्यात आली .यावेळी गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता.  पहाटे चार वाजता श्रीरामाचा गजर करत प्रभातफेरी काढण्यात आली.सकाळी अनेर नदी तिराजवळील राम मंदिरात आरती होऊन नागेश दीक्षित यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.त्या नंतर जितेंद्र पाटील यांनी आयोजित कार्यक्रमात श्रीराम प्रतिमा पूजन करण्यात आले.सायंकाळी उत्तम भोई यांनी  बँडच्या तालात काढलेल्या कलश यात्रेत ट्रॅक्टरवर ठेवलेल्या श्रीराम प्रतिमेचे गावभर पूजन करण्यात आले.त्यावेळी संपूर्ण गावात रांगोळ्या काढून दिवे लावण्यात आले होते. विविध संस्थांचे पदाधिकारी ,रामभक्त व गावकरी सहभागी झाले होते.सायंकाळी तीन ठिकाणी भंडारा व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने