संताजी महाराज मंदिरात श्रीराम प्रतिष्ठा महोत्सव संपन्न

 संताजी महाराज मंदिरात श्रीराम प्रतिष्ठा महोत्सव संपन्न



चोपडा,दि.२३(प्रतिनिधी)- श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेतर्फे संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे श्रीराम प्रतिष्ठा निमित्त श्रीराम उत्सव संपन्न झाला.
 

यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या  मूर्तीची पूजा करून माल्यार्पण करण्यात आले .तसेच श्री हनुमंताची पूजा अर्चा करून माल्यार्पण  करण्यात आले. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीतामय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. यावेळी हनुमंताची  व श्रीरामाची आरती करण्यात आली. सुरुवातीला सामुदायिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. संत श्री संताजी महाराज, पवनपुत्र हनुमान, भगवान श्रीराम यांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी कुमारी  पूर्णिमा उर्फ परी च्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री के डी चौधरी, उपाध्यक्ष टी  एम चौधरी, विश्वस्त नारायण पंडित चौधरी, देवकांचे के. चौधरी, गुलाब चौधरी, किरण आनंदा चौधरी, कौशल्याबाई आनंदा चौधरी, जगदीश मिस्तरी, गौरव पाटील व बाल गोपालांनी या सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला .शेवटी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने