आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या बैठकीत २३जानेवारीपासून राज्यव्यापी महा आंदोलनाचा निर्णय

 


आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या बैठकीत २३जानेवारीपासून राज्यव्यापी महा आंदोलनाचा निर्णय 

छत्रपती संभाजीनगर,दि.७(प्रतिनिधी)आदिवासी कोळी समाज समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय सभेत दिनांक 23 जानेवारी पासून संविधानिक अधिकारासाठी राज्यव्यापी महा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  संविधानिक अधिकार असून सुद्धा राज्याचा आदिवासी विकास विभागाच्या मनमानीमुळे राज्यातील आदिवासी कोळी जमातीवर सतत अन्याय होत आहे.गुजराथ,मध्यप्रदेश, ओरिसा इत्यादी परप्रांतातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या आदिवासींचा प्रचंड दबावमुळे शासन किंवा प्रशासन मूळ मराठी भाषिक टोकरे कोळी, कोळी ढोर,कोळी महादेव, कोळी मल्हार,डोंगर कोळी या अनुसूचित जमातीबाबत कोणताही ठाम निर्णय घेत नाही.शासनाच्या या नाकर्तेपणा मुळे आदिवासी विकास विभागातील स्थलांतरितांची लॉबी बळकट होऊन ती बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या माध्यमातून वरील आदिवासी कोळी जमातीवर गेली चाळीस पन्नास वर्षांपासून अन्याय करीत आहेत.म्हणून राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील आदिवासी कोळी जमातींनी राज्यव्यापी महाआंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे.असे राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक ऍड. शरदचंद्र जाधव यांनी सांगितले.

    

कोळी किंवा हिंदू कोळी अशा नोंदी असल्या तरी अर्जदार टोकरे कोळी, कोळी ढोर,कोळी महादेव, कोळी मल्हार,डोंगर कोळी या पैकीच असल्यामुळे ते ज्या जमातीचे दावा करीत असतील,त्यांनी त्या अनुसूचित जमातीची(एस. टी.ची)प्रमाणपत्रे व वैद्यता प्रमापत्रे मिळालीच पाहिजे,ही राज्यव्यापी आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.असे राज्यव्यापी आंदोलन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी स्पष्ट केले.तसेच या मागण्यांसोबत  समाजहिताच्या इतर मागण्या व हजारो कर्मचारी, अधिकारी बांधवांच्या मुळ सेवा बेकायदेशीररीत्या अधिसंख्य पदावर वर्ग करून त्यांचे अनुज्ञेय लाभ काढून घेण्याऱ्या शासनाच्या बेजाबदार तुघलकी निर्णय विरुध्द या राज्यव्यापी महा आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार आवाज उठवला जाईल,असेही त्यांनी निर्धार पुर्वक सांगितले..


आदिवासी विभागाकडून होणाऱ्या अन्यायाला कायमचाच पायबंद घालण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जमातींनी या सभेत उत्स्फूर्त पणे हजेरी लावली.या सभेत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींनी संघटीतपने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकाच दिवशी, एकाच तारखेला व एकाच वेळेस बेमुदत राज्यस्तरीय अन्नत्यागसह साखळी उपोषण करून राज्यस्तरीय महा आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेतला अशी माहिती आदिवासी कोळी समाजाचे समन्वय समितीचे प्रभारी अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे यांनी केले..


या सभेत अनिता मुदिराज ,श्रीराम अकोसकर,महेंद्र चौगुले,मंगलाताई सोनवणे, विरेंद्र इंगळे,सपकाळे ताई,ऍड.महेश शेवरे व राज्यातील हजारो कार्यकर्ते सह नंदुरबार धुळे जिल्ह्यातील राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.राजेंद्र सावळे,खान्देश महिला अध्यक्ष इंदूताई सोनीस,धुळे जिल्हाध्यक्ष हिराभाऊ वाकडे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष कांतीलाल सोनीस,संजय शिंदे,सरपंच महेश सावळे,नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष ऍड.विलास निकम,शामराव कोळी,निलेश कोळी हे पदाधिकारी उपस्थित होते.या सभेच्या आयोजनाची जबाबदारी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांभाळली अशी माहिती राज्य कार्यकारणी सदस्य  डॉ.राजेंद्र सावळे यांनी दिली आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने