बारामती ऍग्रो ने करार करून शेतकरी धर्म पाळला नाही : विजय पाटील यांचा आरोप

 बारामती ऍग्रोने शेतकरी धर्म पाळला नाही : विजय पाटील यांचा आरोप


चोपडा दि.७(प्रतिनिधी):राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर  टीकेचा भडिमार करणाऱ्यांनो जरा पायरी ओळखून पाय टाकावा नाहीतर खाली पडाल  असा उपरोधक टोला  जामखेड कर्जत चे आमदार रोहित पवार यांना लगावून बारामती अॕग्रोने चोपडा साखर कारखाना कराराच्या चिंधड्या उडवत शेतकरी धर्म पाळला नसून त्यास   राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व पदाधिकारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय दत्तात्रय पाटील यांनी लगावला आहे.

अजित पवार मित्रमंडळ अशी टीका करून खिल्ली उडवून अजितदादा यांचा अपमान केल्याबद्दल म्हणून आ.रोहित पवार यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. ते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत बोलत होते .यावेळी अजित पवार गट जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी युवक जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष  मिलिंद सोनवणे हे उपस्थित होते.

तदनंतर सुनील पाटील यांनी  सांगितले की,रोहित पवार हे काका बाबांच्या जीवावर पुढे आलेले आहेत आणि  आपल्या उंची पेक्षा मोठे नेते अजित पवार यांच्यावर टीका टिपण्णी करतात म्हणजे   रोहित पवार हे शिशु विहारात असल्यागत बोलतात अशी टीका केली. 

ऊसाला सर्वत्र २ हजार आठशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल  भाव असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरून केवळ २ हजार ३०० रू चा नीचांकी भाव बारामती ऍग्रो कडून दिला जात  असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने