आदिवासी टोकरे कोळी जमात अन्नत्याग सत्याग्रहाचा पाचवा दिवस ..निर्दयी प्रशासनकर्त्यांची चुप्पी.. उपोषणार्थी ची तब्येत खालावली

 आदिवासी टोकरे कोळी जमात अन्नत्याग सत्याग्रहाचा  पाचवा दिवस ..निर्दयी  प्रशासनकर्त्यांची चुप्पी.. उपोषणार्थी ची तब्येत खालावली





जळगाव दि.७(प्रतिनिधी)– दि. ४ जानेवारी २०२४ पासून शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे आदिवासी टोकरे  कोळी जमातीच्या वतीने श्री.पुंडलिक सोनवणे व श्री. प्रभाकर कोळी या बांधवांच्या वतीने दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री यांनी आदेशित केल्याप्रमाणे  आदिवासी टोकरे कोळी जमातीला सुलभरीत्या जात प्रमाणपत्र मिळावे व वैधता प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणी दूर होण्याकरिता सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासपूर्वक समिती गठीत होऊन शासनाकडून न्याय मिळावा अशा प्रमुख मागण्यांना अनुसरून अन्नत्याग सत्याग्रह पुकारण्यात आले आहे.

         सदर उपोषणाला चार दिवस उलटले पण अद्याप प्रशासनाकडून व शासनाकडून उपोषणार्थीच्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान काल उपोषणार्थी श्री.प्रभाकर कोळी यांची तब्येत खालावली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन श्री.प्रभाकर कोळी काही तासातच पुन्हा उपोषण स्थळी दाखल झाले. प्रशासनाने या बाबीची तात्काळ दखल घेऊन आदिवासी टोकरे कोळी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी उपोषण स्थळावरून आंदोलकांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने