वडगाव बु// ग्रामपंचायत लोक नियुक्त सरपंचपदी सौ.प्रतिभा गणेश पाटील तर उप सरपंचपदी राकेश गुलाबराव पाटील यांची वर्णी


वडगाव बु// ग्रामपंचायत लोक नियुक्त सरपंचपदी सौ.प्रतिभा गणेश पाटील तर उप सरपंचपदी राकेश गुलाबराव पाटील  यांची वर्णी 

चोपडा दि.१(प्रतिनिधी):वडगाव बु//ता.चोपडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक- 2023 च्या जनता जनार्दन प्रणित परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असून लोकनियुक्त सरपंचपदी कोणतेही राजकीय वारसा नसलेले  सौ.प्रतिभा गणेश पाटील यांची तर उपसरपंचपदी श्री. राकेश गुलाबराव पाटील  निवड करण्यात आली आहे.

या निवडीत गावातील तरुण युवक यांनी सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अपक्ष परिवर्तन पॅनल चे संघटन करून समोरच्या सत्ताधारी, राजकीय वरदस्त , घराणेशाही असलेले नम्रता पॅनल चा विरुद्ध नवख्या उमेदवारांनी जोरदार लढत देऊन विजयश्री खेचून आणली आहे यात सदस्यपदी  सौ.सुनंदा राजेंद्र पाटील, सौ.उषा शंकर पाटील सौ .शालुबाई गुलाबराव पाटील  यांची वर्णी लागली आहे.. 

लोकनियुक्तसरपंचा सौ .प्रतिभा गणेश पाटील ह्यांनी परिवर्तन पॅनलच्या विकासात्मक अजेंडा नुसार  गावातील विविध समस्या सोडवणे, सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांना न्याय देणे ,ग्राम विकासाचे विविध कामे हाती घेणे, तरुणांना स्वयंरोजगार साठी प्रशिक्षित करणे, महिलांचे सबलीकरण करणे, शेतकऱ्यांसाठी विकासात्मक धोरण आखणे, वृद्ध ,अपंग यांच्या समस्या सोडवणे, घरकुल, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला काम देणे, आरोग्याच्या समस्या दूर करणे, अशा विविध विकासकामांचे धोरण  असलेला  अजेंडा असल्याचे मत व्यक्त केले आहे . यावेळी उपसरपंच निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. चंद्रकांत किंगे  यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामसेवक श्री.मल्हारराव पाटील  यांच्या सह नवनिर्वाचित सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने