चोपड्यात विज वितरण कर्मचाऱ्यांचे आमदारांना विविध मागण्यांचे निवेदन

 चोपड्यात विज वितरण कर्मचाऱ्यांचे आमदारांना विविध मागण्यांचे निवेदन 

चोपडा दि.१(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या चोपडा येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे ह्यांना देऊन आपले ग्राऱ्हाणे मांडले आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनीच्या कार्यकाळ पाहता जे तळागाळात काम करणारे कामगार आहेत त्यांचे आजपर्यंत कोणतेच प्रश्न सोडविले गेले नाहीत त्यात वायरमन बांधवांवर कायम अन्याय होत आलेला आहे त्यामुळे  दिनांक 30/11/2023 रोजी चोपड़ा येथे सर्व लाईनमन स्टाफ बंधूनी  आमदार सौ लताताई सोनवणे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृति समिती मार्फत सध्या  राज्यभर चालू  आंदोलन छेडले आहे त्याचाच  एक भाग म्हणून लाईन स्टाफ बांधवांनी हे निवेदन दिले आहे यावेळी वायरमन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने