चोपडा फॉर्मसी कॉलेजात योगा प्रशिक्षण संपन्न
चोपडा दि.१(प्रतिनिधी)श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथे महाविद्यालय स्तरीय एक महिन्याचे योगा प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित , श्रीमती.शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात चतुर्थ वर्षीय विद्यार्थ्यासाठी योगा अभ्यास तसेच प्रशिक्षण YC23-24 आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आरोग्यदाई व तणावमुक्त कसे राहता येईल हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील चतुर्थ वर्षातील १२१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. उत्तीर्ण झालेल्या सर्व १२१ विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सदरहू या प्रशिक्षणाच्या आयोजनाला संस्थेचे अध्यक्ष अँड. संदिप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील ,सचिव सौ.डॉ.स्मिताताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नॅक समन्वयक (NAAC Coordinator) प्रा.डॉ एम. डी. रागीब, (IQAC Coordinator) डॉ. सौ. सुवर्णलता महाजन व सहायक प्राध्यापक तसेच योगा प्रशिक्षण समन्वयक कु. निशा गिरिश भाट यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. प्रफुल्ल मोरे व सर्व विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
