भुसावळ डाक विभागामार्फत डाक जीवन विमा रकमेचा १५ लाखाचा धनादेश वारसास प्रदान

 भुसावळ डाक विभागामार्फत डाक जीवन विमा रकमेचा १५ लाखाचा धनादेश वारसास प्रदान


   चोपडा दि.१(प्रतिनिधी ):-विद्या विहार कॉलनी  येथील रहिवासी नितीन दामोदर मोरे यांनी जून-२०२१ मध्ये १५ लाख रकमेचा डाक जीवन विमा चोपडा डाक कार्यालयातून कार्यालयातून घेतलेली होता. मात्र त्यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाले. केवळ काही कालावधीचे हप्ते नियमित भरल्याने, नियमानुसार वारसदारास सदर विमाच्या रक्कम मिळणे आवश्यक होते. त्यानुसार मयत नितीन दामोदर मोरे यांच्या पत्नी श्रीमती योगिता अर्जुन भोई या वारसदार असल्याने भुसावळ मुख्य डाकघर कार्यालयाने त्यांच्याकडून तात्काळ फॉर्म भरून मृत्यू दावा प्रकरण दाखल करून घेतले.

         अल्पावधीतच टपाल खात्याने त्यांचा सदर मृत्यू दावा मंजूर केला व सदर दाव्याची रक्कम रुपये १६,८९,४६०/- धनादेशामार्फत वारसदारास चोपडा डाक कार्यालयात कुंदन बी. जाधव ( डाक अधीक्षक भुसावळ )  यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी  एम.बी.रूळे ( सहाय्यक डाक अधीक्षक मुख्यालय ) , बी.ए सैंदाणे ( डाक निरीक्षक यावल उप विभाग ) , मनोज पाटील (  पोस्टमास्तर चोपडा  ) तसेच चोपडा डाक कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

            यावेळी डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन कुंदन बी. जाधव ( डाक अधीक्षक, भुसावळ विभाग,भुसावळ ) यांचेकडून करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने