कुसूंबा येथील जवान विकास कोळी यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..
चोपडा,दि.१(प्रतिनिधी) तालुक्यातील कुसूंबे येथील रहिवासी सीआरपीएफ कोब्रा कमांडो जवान विलास आत्माराम कोळी हे दिवाळीची सुटी आटोपून देश सेवेसाठी परत जात असतांना अपघात होऊन विरगती प्राप्त झाल्याने आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सौ.लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा ग्रामीण पोनि कावेरी कमलाकर, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील,कृउबा समिती सभापती नरेंद्र पाटील, पं.स.माजी उपसभापती एम.व्ही.पाटील, योगेश देसले जिल्हा सैनिक कार्यालय अधिकारी उपस्थित होते.
विलास कोळी हे २०२कोब्रा कमांडो जवान असून कोरापट येथे देशसेवेत कार्यरत होते ते दिवाळी ची सुटी परिवार सोबत देश सेवेसाठी परत जात असतांना अपघात होऊन विरगती प्राप्त झाली आहे त्यांनी पुणे नागपूर, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, झारखंड, आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.त्यांच्या पश्चात आजी ,वडील, पत्नी, १मुलगा, २ मुली असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूने गावभर शोककळा पसरलीअसून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

