चोपड्यात अवैध गुरे वाहतूकधारकांची मुजोरी.. कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जीव घेणा हल्ला..५ जणांना अटक.. सपोनि साबळे जखमी

 

चोपड्यात अवैध गुरे वाहतूकधारकांची  मुजोरी.. कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जीव घेणा हल्ला..५ जणांना अटक.. सपोनि साबळे जखमी


चोपडा दि.२(प्रतिनिधी)चोपडा शहरात शेतपुरा भागात जाणा-या जुना यावल रोडवर सपोनि नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ  कत्तलखान्यात जाणारे अवैध वाहतूक पकडण्याचा राग मनात ठेवून एका विशिष्ट टोळक्याने एकत्रित येऊन सहाय्यक पोलिस निरिक्षक  व पोलिस कर्मचाऱ्यांस फायटर व काठीने  जबर मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली.याप्रकरणी पोलीस ताफा मागण्यात येऊन मारेकऱ्यांची धरपकड करण्यात आली असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे तर २ जण फरार झाले आहेत.


याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,
अवैद्यरित्या  गोवंश जातीच्या जनावरांच्या वाहतुक करणा-या  लोकांवर पोलीस कारवाई करीत असतात याचा राग मनात धरून सपोनि अजित सावळे व पोहेकाॕ संतोष पारधी यांना शेतपुरा भागात जाणा-या जुना यावल रोडवर नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ सार्वजनीक जागी रात्री ११:००वाजेच्या सुमारास  शेख साजीद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी,शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी,झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी,शेख इब्राहीम शेख हमीद कुरेशी,शेख नाजीम शेख युनुस,शोएब सलीम कुरेशी,रईस रज्जाक कुरेशी (सर्व रा सानेगुरुजी वसाहत चोपडा) व इतर 10 ते 15 लोकांनी सदर ठिकाणी गैरकायदयाची मंडळी जमवून हल्ला चढवून काठीने व फायटरने मारहाण केली.



सपोनि अजित सावळे यांच्या फिर्यादीवरुन  आरोपितांविरुध्द  शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं/ भादवि कलम/सी सी टी एन एस गुरनं 609/2023 भादंवि कलम 307,353,332,143,147,148,149,323,506,427,109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.असून ५जणांना अटक करण्यात आली आहे तर २ पसार झाले आहेत ते लवकरच पोलिस जाळ्यात अडकतील.
पुढील तपास पोनि के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि घनश्याम तांबे हे करित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने