घुमावल बुद्रुकचे युवराज पाटील ठरले जिल्ह्यात"लकी मॅन"उपसरपंचाच्या नशिबी सरपंचपदाची खुर्चीही ..रिक्त एसटी पद उपलब्ध न झाल्याने दुग्ध शर्करा योग

 घुमावल बुद्रुकचे  युवराज पाटील ठरले जिल्ह्यात"लकी मॅन"उपसरपंचाच्या नशिबी सरपंचपदाची खुर्चीही ..रिक्त एसटी पद उपलब्ध न झाल्याने दुग्ध शर्करा योग 

चोपडा दि.३(प्रतिनिधी)तालुक्यातील घुमावल बु गावाचे उपसरपंच युवराज गणपत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच एसटी पद रिक्त असल्याने प्रभारी  उपसरपंच म्हणून युवराज पाटील हेच ग्रामपंचायत चालवण्यात येणार आहे .या निवडीबद्दल  त्यांचेवर  तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.उपसरपंचपदासह सरपंच पदाचा कार्यभार तेच सांभाळणार असल्याचा दुग्ध शर्करा योग त्यांच्या नशिबी आल्याने ते जिल्ह्यात लकी मॅन ठरले आहेत.

 यावेळी  माजी उपसरपंच अशोक पाटील ,सदाशिव पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील ,गावाचे पोलिस पाटील हिरामण पाटील ,धनराज पाटील, भगवान पाटील, बबनराव पाटील, अमोल पाटील ,गोपीचंद पाटील, माजी उपसरपंच प्रविण पाटील, ज्ञानेश्वर पाटील ,संजय पाटील ,मनोज पाटील, वना पाटील ,देविदास पाटील, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील ,विजय पाटील ,रवींद्र पाटील सुभाष पाटील सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने