नागपूर पेन्शन मोर्चासाठी संजय सोनार यांची जळगांव ते नागपूर बाईक रॅली
♦️१२ डिसेंबर,नागपुरात जुनी पेन्शन संघटनेचा "पेन्शन जनक्रांती महामोर्चा" राज्यभरातील लाखो कर्मचारी होणार सहभागी.
जळगाव दि.३(प्रतिनिधी)..भडगाव येथील आरोग्य सेवक तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग राज्यप्रमुख संजय सोनार (कळवाडीकर) यांच्या पेन्शन संघर्ष यात्रेस आज दु.३ वाजता जळगांव येथील जिल्हा अधिकारी कार्यालय येथून शुभारंभ झाला.यावेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी, "एकच मिशन, जुनी पेन्शन ! चलो नागपूर, पेन्शन जनक्रांती महामोर्चा ! पेन्शन आमच्या हक्काची !!" या आणि इतर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग राज्यप्रमुख संजय सोनार कळवाडीकर हे १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या नागपूर येथील पेन्शन जनक्रांती महामोर्चाच्या जनजागृतीसाठी जळगांव ते नागपूर ही बाईक रॅली करत आहेत.सदरच्या बाईक रॅलीला "पेन्शन संघर्ष यात्रा" असे नाव देण्यात आले असुन, २० जिल्ह्यातून ही रॅली जाणार असून जवळपास ३ हजार किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून हे करणार आहेत.
११ डिसेंबर रोजी ही यात्रा नागपुर महामोर्चाच्यासाठी दाखल होणार आहे.सदर पेन्शन जनक्रांती महामोर्चा चे आयोजन हे "महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने" केलेले असून, महाराष्ट्र शासनाने पूर्वीप्रमाणेच राज्यातील २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना बंद केलेली, जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना पुनः बहाल करावी म्हणून महामोर्चाचे प्रयोजन आहे.
या महामोर्चात राज्यातील लाखो शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी लाखोंच्या संख्येने सामील व्हावे यासाठी देखील संजय सोनार बाईक रॅलीवर निघाले आहेत.
या बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी जुनी पेन्शन संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष डॉ.कुणाल पवार,विभागीय उपाध्यक्ष भास्कर वानखेडे,पेन्शनयोद्धा आर डी निकम, राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे, संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख सचिन देशमुख व जिल्हा सचिव विपीन पाटील,कार्याध्यक्ष संदीप पाटील,सल्लागार नाना पाटील,जिल्हा मुख्य संघटक कल्पेश चौधरी, संदीप सनेर, सुनील पारधे, मंगेश धनगर,राजेश सोनवणे,शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, आरोग्य कर्मचारी विजय देशमुख, प्रमोद मगरे, राजेश कुमावत, सुनील महाजन, रविकिरण पवार, रामकृष्ण साळुंखे, संदीप सावकारे, अमोल इंगळे, विपुल लोणारी सहित सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व शासकीय पेन्शन फायटर्स हे मोठया संख्येने उपस्थित होते.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
१२ डिसेंबरच्या पेन्शन जनक्रांती महामोर्चासाठी, मदत म्हणून नाशिक,मालेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर डी निकम यांनी पेन्शन लढा निधीचा ५१ हजारांचा धनादेश यावेळी आरोग्य विभागप्रमूख संजय सोनार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेला दिला आहे.
पेन्शनयोद्धा म्हणून आर डी निकम संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत.याआतापर्यंत त्यांनी देशात व राज्यात चार वेळा पेन्शन संघर्ष यात्रा केली असून ७ हजार कि.मी प्रवास सायकलवर केला आहे.त्यांच्या मुंबई ते दिल्ली सायकलवारीची संपूर्ण देशभरात चर्चा झाली आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
