शब्द पाळणाऱ्या वाळकी सरपंच रुखमाबाई वसंतराव कोळी यांनी खुर्चीवर बसताच स्व: पदरमोड करून केला घोडगाव रस्ता दुरुस्ती कामाचा श्रीगणेशा
चोपडा,दि.३(प्रतिनिधी ) तालुक्यातील वाळकी- शेंदणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रुखमाबाई वसंतराव कोळी यांनी सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होताच तडकाफडकी घोडगाव रस्ता दुरुस्ती कामाचा नारळ फोडून श्रीगणेशा केला आहे.
गेल्या दोन तीन वर्षांपासून वाळकी घोडगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला होता . त्यामुळे रहदारीही बंद होती याचे गांभीर्य ओळखून निवडणूक काळात रुखमाबाई कोळी यांनी आपण निवडून आल्यास स्व: खर्चाने रस्ता दुरुस्तीचे काम करून देईल असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते.शब्दपूर्ती म्हणून त्यांनी स्व खर्चाने रस्ता दुरुस्तीचे कामास
जेसीबीला नारळ फोडून सुरुवात केली आहे . त्यामुळे "जान जाई पर बचनन जाई " हे सत्यात उतरवणाऱ्या सरपंचांचा गावात उदोउदो होतो आहे.वास्तविक पाहता अनेक महाभाग निवडणूकीच्या धुमाकूळीत आश्वासनांची सरबत्ती वाहतात पण प्रत्यक्षात ते तसे करत नाही.काम सरो वैद मरों अशी गत अनेकांची असते मात्र रुखमाबाई कोळी हे त्याला अपवाद ठरल्या आहेत.त्यांनी आपल्या बटव्याला चिमटा देत पदरमोड करून गावकऱ्यांचे मन जिंकण्यास प्रारंभ केल्यामुळे गाव विकासाचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत आँखो देखत गावकऱ्यांना पाहायला मिळते आहे त्यामुळे सरपंच रुखमाबाई कोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी भरत वसंत कोळी, बाळु रामदास पाटील, प्रविण राजपूत, चंद्रकांत लालचंद सुर्यवंशी ,दिपक वसंत पाटील, समाधान गोकुळ कोळी, भावडु अशोक पाटील,व वाळकी शेंदणी गावाचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
