मनगटावर लढाई जिकणारे लढवय्ये कै. शिवदासजी चित्ते

 

मनगटावर लढाई जिकणारे लढवय्ये कै. शिवदासजी चित्ते

------------------------------------------------------------------
नंदुरबार जिल्ह्यातील ख्यातनाम प्रशासकीय अधिकारी शिवदास चित्ते साहेब यांचे  स्मृतींना  सलाम !.व भावपुर्ण शब्दांजली !..*साहेबांशी कौटुंबिक नाते असल्याने,त्यांचा लहान कार्यकर्ता म्हणून मी संस्कारित करावा.....मी त्यांचा जीवनपट शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला....*अचानक एक निरोप आला.त्या निरोपावर  माझा विश्वास बसला नाही .तो निरोप होता चित्ते साहेबांचा निर्वाणाचा. खरचं जीवन किती क्षणभंगुर असते...?"शब्दांकन                                                                         ‌डॉ. राजेंद्र सावळे

------------------------------------------------------------------

संघर्षयात्री: मा.शिवदास चित्ते साहेब

*नंदुरबार शहर परिसराचा,इथल्या सार्वजनिक जीवनाचा,कोर्ट कचेऱ्यांचा,न्यायालयीन व्यवस्थेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल,तेव्हा काही नावे अगत्याने लिहीली जातील.त्यात आपल्या नंदुरबार नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी शिवदास चित्ते साहेब यांचं नाव नक्की असेल.त्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही...*

*चित्ते साहेब यांचा जन्म आपल्या नंदुरबार येथे पिता सुकलाल चित्ते(कोळी) यांच्या पोटी झाला.वडील पेशाने हातमजुरी करीत होते.त्यांचे मुळ गाव चीमठाने ता.शिंदखेडा होते...*

साहेबांचे बालपण आणि B.Sc. पर्यंतचे शिक्षण अमळनेर येथे झाले.घरात आई वडील,भाऊ, बहिणी असे मोठे कुटुंब होते.परिस्थिती जेमतेम असल्याने पूर्ण भिस्त मजुरीवर असायची.त्यामुळे आर्थिक ओढाताण पांचवीलाचं पुजलेली. अशावेळी B.Sc  करुन कुटुंबाला आधार द्यायचा विचार चित्ते साहेबांचा मनात सारखा चालायचा...
वृद्ध आई वडील, बहीण, शिकत असलेले लहान भाऊ,बहिण ही सर्व मंडळी नजरेसमोर यायची.व त्या सर्वांचं उदरभरण कसं होईल या विचाराने काळजात धस्स होई.या सर्व विवंचनेत त्यांनी अभ्यासाचा सराव नसल्याने B.SL परीक्षा दिली आणि ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत..."*

शिवदास चित्ते साहेबांनी शिक्षणाचा गाशा गुंडाळत नोकरी शोधायचा आटापीटा केला.पण नशीब एवढं होतं की नंदुरबार नगरपालिकेत नोकरी  मिळाली.नियती पुन्हा कामाला लागणार होती म्हणून समाजात प्रस्थापित व्हायचं आणि नोकरीसाठी कोणाच्या दारावर जायची वेळ येऊ दिली  नाही...समाजकार्यात वळण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला....

या नंतर संकटाचे ढग दूर होत आता सूर्योदयाची वेळ जवळ येत होती.याच सुमारास मुळ नंदुरबार येथे नोकरी करत असताना राजकीय नेते बटेसिंग भैय्या ,अण्णासाहेब पी.के.पाटील साहेब यांच्याशी संपर्क आला.नंदुरबार स्थिर स्थावर होतांना चित्ते साहेब कायदेतज्ञ असल्याने वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन करत असल्याने अनेक दिग्गज नेते व अनेक संस्थेच्या संपर्कात असायचे....

काही वेळा राजकीय पक्षांच्या संघर्षातून तिसरी बाग फुलत असते.1995/96 च्या सुमारास अखिल भारतीय कोळी समाज या राष्ट्रीयकृत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आमदार कांती कोळी साहेब ,प्राचार्य प्रदीप नवसारे, कै.पांडुरंग शिरसाठ या गुरु शिष्यांमध्ये सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला होता.आदिवासी कोळी समाजासाठी भरपूर योगदान देऊन विधायक काम केले...तसे सुरुवाती पासूनच नंदुरबार जिल्ह्याचे नेते कै.बटेसिंग भैय्या यांनी आपला कायदेशीर सल्लागार म्हणून नेमलं होतं...union असो की अनेक राजकीय संघर्ष न्यायालयीन प्रक्रियेतून गेले.समाज कार्या मधील संघर्ष शिवदास चित्ते साहेबांच्या करिअरला पूरक ठरला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही...एका बाजूला नोकरी बहरत असतांना दुसऱ्या बाजूला संसार वेलीवर उगवलेली दोन्ही रोपटी बहाराला येत होती.

सदर लेखाचा समारोप करतांना सांगावसं वाटतं की, कै.मा.शिवदास चित्ते साहेबांची ही जीवनगाथा अनेक नवोदित, संघर्षरथ तरुणांसाठी नंदादीपा प्रमाणे तेवत राहील.प्रेरणा देत राहील.संघर्ष करने वालों की हार नही होती हे सांगणारी राहील.तुमच्यात अंगभूत गुण राहिले की, मग कोणीही तुमचा सुर्योदय रोखू शकत नाही.कारण वनाचा राजा सिंह उपजतच राजा असतो. त्याला राज्याभिषेकाची गरज नसते.

नाभिषेको न संस्कार: सिंहस्य !.क्रियते वने
विक्रमार्जितराजस्य* *स्वयमेव मृगेंद्रता. !!

वनामध्ये सिंहाला कोणी राज्याभिषेक किंवा संस्कार करत नाही.तर अंगभुत पराक्रमाच्या जोरावर तो स्वतःच मृगेंद्र म्हणजेच राजा हे स्थान मिळवतो.आदिवासी कोळी सामाजिक संघर्षातून स्थापित झालेल्या योग्य व्यक्तिमत्व कै.मा.एस.एस.चित्ते साहेब आपल्यात नाहीत.ही खूप मोठी हानी आहे...**शिवदास चित्ते साहेबांना भावपूर्ण आदरांजली !..* 

                                                   🌼शब्दांकन     🌼                                                        ‌डॉ. राजेंद्र सावळे



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने