जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे

 जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे

चोपडा,दि.१३ (प्रतिनिधी); - जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा येथील गोदाम व्यवस्थापक  योगेश नन्नवरे यांची निवड करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सर्व साधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची  नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. ती अशी,

♦️अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा,

♦️उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,

♦️कोषाध्यक्ष : घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव,

♦️कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर,

♦️सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का.  

यावेळी जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे , देवेंद्र चंदनकर नायब राज्यपाल तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार, शैलेश परदेशी सह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्त्वाविक रविंद्र माळी यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने