शेतकऱ्यांचे दु:ख,श्रम व भावना कवितेतून मांडण्याच्या माझा प्रयत्न : सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव

 शेतकऱ्यांचे दु:ख,श्रम व भावना कवितेतून मांडण्याच्या माझा प्रयत्न : सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव 


भडगाव दि.१३(प्रतिनिधी): साहित्यात आई वरील अनेक नामवंत लेखकांनी अजरामर कविता लिहल्यात पण बापावरील पहिली कविता मी लिहली व ती सातत्याने शालेय अभ्यासक्रमात लावण्यात आली कारण ग्रामीण बापाचे दुःख, वेदना, श्रम पहिल्या प्रथम जगासमोर मी आणले.शिक्षक व विदयार्थी यांनी ही कविता कायम अभ्यासक्रमात ठेवण्यासाठी अभ्यास मंडळास पत्रे लिहली.शेतकरी संघटनेच्या मेळाव्याची सुरुवात माझ्या कवितेने होत असे व शरद जोशीच्या भाषणाने सांगता होत असे. मी एकही निसर्ग कविता, शृंगारिक कविता लिहली नाही तर या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना वर 500 कविता लिहल्या, ज्यातून शेतकऱ्याचे दुःख, श्रम, भावना, यातना मला समाजासमोर मांडता आल्या असे भावस्पर्शी उदगार सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी येथील केशवसूत ज्ञानप्रभोधिनी आयोजित व्याख्यान मालेच्या तिसऱ्या पुष्पात व्यक्त केले. 

व्यासपीठावर लोटन लाला पाटील, सौं. विजया पाटील, स्मित क्रिएशन चे संचालक महेश व जितेंद्र पोतदार हे होते. आपल्या भारदस्त आवाजात भालेराव यांनी गावाकडे चल माझ्या दोस्ता, बाप, कुणब्यांची पोर आता लढायला शिक, दोस्ता, गाई घरा आल्या इत्यादी कविता श्रोत्यासमोर सादर केल्या व श्रोत्यांना शेतकरी, कष्टकरी समाजाविषयी विचार करण्यास प्रवृत्त केले.आपली जडणघडन कवी म्हणून कशी झाली या विषयी विस्तृत स्वरूपात माहिती देऊन त्यांनी तरुणांना प्रेरित केले. एखाद्या कवीच्या नावाने सुरु केलेली ही व्याख्यानमाला व तिचे आयोजन, श्रोत्यांची रसिकता या बाबत गौरोदगार काढले. हे पुष्प कै. नथाबाई लाला पाटील व कै. शोभना रमेशचंद्र पोतदार यांच्या स्मृती पित्यर्थ श्री लोटन पाटील व महेश पोतदार यांनी प्रायोजित केले होते.कार्यक्रमास तहसीलदार मुकेश हिवाळे,मुख्याधिकारी रवींद्र लांडे, विकास नवाळे, प्राचार्य बी. एन. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, पाचोरा, शेंदुर्णी येथील प्राध्यापक मोठया सख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल देशमुख यानी तर आभार केशवसूत ज्ञान प्रभोधनीचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने