वाळकी मुक्कामी बस पुन्हा सुरु होणार.. सरपंचांच्या निवेदनाला आगार व्यवस्थापकांचा हिरवा कंदील


वाळकी मुक्कामी बस पुन्हा सुरु होणार.. सरपंचांच्या निवेदनाला आगार व्यवस्थापकांचा हिरवा कंदील


चोपडा दि.१२(प्रतिनिधी)तालुक्यातील वाळकी शेंदणी गावात सुरू असलेली मुक्कामी बस कोरोना काळात बंद झाल्याने पुन्हा सुरूच झाली नाही त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची अत्यंत गैरसोय होत आहे शिवाय  गावकऱ्यांचीही बस अभावी  मोठ्या प्रमाणावर फजिती होत आहे .या कारणास्तव सरपंच रुखमाबाई कोळी,  गावातील भरत वसंतराव कोळी व ग्रामपंचायत सदस्य यांनी एका निवेदनाद्वारे मुक्कामी बस सुरू करावी असे स्थानक प्रमुख यांना निवेदन दिले आहे.त्यावर डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी  येत्या एक दोन दिवसात मुक्कामाची बस सुरू करण्याचे आश्वासन दिलेले आहे.
सदरील बस घोडगाव गलंगी मार्गे  वाळकी मुक्काम  चालू होती मात्र कोरोना काळात ही बस बंद झाली त्यानंतर कोणीही लक्ष घातले नाही आता नवनिर्वाचित सरपंच रुखमाबाई कोळी यांनी जातीने लक्ष घालून प्रथम हा रस्ता पदरमोड करून सुस्थितीत आणलाअन् आता बस सुरू करण्याचे निवेदन चोपडा आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांना देऊन विनंती केली असता त्यांनी काहितरी तोडगा काढून बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. एकंदरीत ही बस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी सरपंच व ग्रा.प.सदस्य  व  भरत वसंतराव कोळी, बालरवी सुर्यवंशी, अमोल पाटील, समाधान कोळी, ज्ञानेश्वर पाटील, जीभु पाटील, संजय भिल, योगेश राजपुत, श्रावण कोळी ,मधुकर धनगर, दिशेने राजपूत, सतिष कोळी, सुनील नाईक, अजीत राजपुत ,छोटु कोळी ,कृष्णा कोळी ,छोटु धनगर ,प्रकाश कोळी गोलु न्हावी ,विनायक पाटील, पुंजू पाटील ,दिपक पाटील, जितेंद्र पाटील व गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने