आश्रम शाळा मुख्याध्यापक सुनिल हिरालाल चौधरी यांचा २९ रोजी सेवापूर्ती सोहळा
साक्री दि.२७ (प्रतिनिधी)आश्रम शाळा मुख्याध्यापक सुनिल हिरालाल चौधरी हे दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय साक्री येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. त्यांनी मुख्याध्यापक, सहा. प्रकल्प अधिकारी, गृहपाल, गृहप्रमुख व शिक्षक या पदावर सेवा बजावली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्री. रविंद्र शेळके हे भूषविणार असून
प्रमुख अतिथी श्री. साहेबराव सोनवणे(तहसीलदार साक्री),
श्री. प्रमोद पाटील (प्रकल्प अधिकारी ए.आ. विकास प्रकल्प, धुळे), श्री. शैलेशजी पटेल(सहा. प्रकल्प अधिकारी
ए.आ. विकास प्रकल्प, धुळे),श्री.पी.के. ठाकरे(सहा. प्रकल्प अधिकारी ए.आ. विकास प्रकल्प, धुळे),श्री. राजेंद्र सोनवणे( नायब तहसीलदार,) हे उपस्थित राहणार आहेत.असे आयोजक
अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष तथा सर्व मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, नाशिक व
प्रकल्प कार्यालय धुळे व तहसीलदार कार्यालय साक्री येथील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद आणि सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळा मुख्याध्यापक,
क्षअधिक्षक, गृहपाल व सर्व कर्मचारी वृंद यांनी कळविले आहे.
