चोपड्याचे इंजि .कु.पवन शिरसाठ लिखित Balancing Act पुस्तक सोशियल मिडियाधारकांना ज्ञानाचा खजिनाच.. !
चोपडा दि.27(प्रतिनिधी)सोशल मीडियाच्या पडद्यावर वर्चस्व असलेल्या इंजि.पवन संजीव शिरसाठ लिखित Balancing Act : थ्रिव्हिंग इन द सोशल मीडिया एरा या पुस्तकाची निर्मिती चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली असून अल्पावधीतच पुस्तकाने आपली छबी उमटायला सुरूवात केली आहे.नोशन प्रेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले असून सोशियल मिडियाच्या चाहत्यांना ज्ञानाचा खजिनाच उपलब्ध झाला असल्याने अमेझॉन व पोथी डॉट कॉमनेही विशेष दखल घेतली आहे.
कु.पवन शिरसाठ हे Computer science आणि रोबोटिक्समध्ये दुहेरी पदवी घेत आहे त्यांनी आपले अनुभव, अंतर्दृष्टी आणि धोरणे डिजिटल युगात भरभराटीचा मार्ग दाखविण्या आटोकाट प्रयत्न केला आहे. तसेच इंटरनेटच्या संभाव्यतेचा उपयोग करून घेतला आहे, यूट्यूबपासून फेसबुक, इंस्टाग्रामपर्यंत आणि त्यापलीकडे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, वेब डेव्हलपमेंट, डिजिट मार्केटिंग आणि बरेच काही एक्सप्लोर केले आहे.त्यांनी सर्वस्व-प्रेरित शिक्षणाद्वारे या पुस्तकाची निर्मिती केली आहे." Balancing Act : थ्रिव्हिंग इन द सोशल मीडिया एरा" हे पुस्तक डिजिटल लँडस्केपद्वारे एक प्रेरणादायी प्रवास करेल. पवनची कथा डिजिटल युगात स्वयंप्रेरित शिक्षणाची एक अदभूत शक्ती दर्शवते.
या पुस्तकात स्क्रीनचे वर्चस्व असलेल्या जगात तुमच्या वास्तविक आणि डिजिटल जीवनात संतुलन कसे शोधायचे, सोशल मीडियावर तुमची उपस्थिती, प्रेक्षक आणि प्रभाव वाढवण्यासाठी धोरणे,गोपनीयता, सुरक्षितता आणि नैतिक ऑनलाइन वर्तनाच्या गुंतागुंतांवर नेव्हिगेट करणे,सोशल मीडिया विश्लेषणाद्वारे यश मोजण्याची कला, वैयक्तिक ब्रँडिंग आणि व्यावसायिक यशासाठी सोशल मीडियाचा फायदा घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
कु.पवन शिरसाठ हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द या छोट्याशा गावातील रहिवासी असून गावांचे नांव देशा पलिकडे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांचे सुपुत्र असून पत्रकार महेश शिरसाठ यांचे पुतणे आहेत.त्यांच्या पुस्तक निर्मिती बद्दल वाचकांसह दिग्गजांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.पुस्तकाची प्रत अत्यल्प दरात उपलब्ध असल्याने आजच मिळवा आणि डिजिटल युगात भरभराट व्हा! असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुस्तक मिळवण्यासाठी नोशन प्रेस (NotionPress.com),पोथी (pothi.com),अमेझॉन (Amazon.com) यावर उपलब्ध आहे अथवा पवन शिरसाठ(मोबाईल नंबर📞7756832883 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
