पाचोरा महाविद्यालयात संविधान दिवस साजरा
पाचोरा दि.२७(प्रतिनिधी)- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, एम. एम.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पाचोरा, परीक्षा विभागाच्या वतीने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील हे होते. याप्रसंगी प्रा. आर. बी. पाटील शुभहस्ते संविधान प्रतीचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयचे उपप्रचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संविधान दिनाचा उद्देश भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करणे हा आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जसे मुलभूत अधिकार दिले आहेत तसेच प्रत्येक नागरिकाने आपले मुलभूत हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडण्याची जबाबदारी देखील दिली आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले संविधान वाचले पाहिजे व जीवन जगतांना त्याचा अंगिकार केला पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी भारतीय संविधान सर्व भारतीयांना एकता, न्याय, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र जोडते, त्यातील मौलिक तत्त्वे, मुलभूत अधिकार व कर्तव्ये सर्व सुजान भारतीय नागरिकांनी आंगिकारली पाहिजेत व त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे विषद केले.
अध्यक्षीय समारोपानंतर प्रा. योगेश पुरी यांनी भारताचे संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. सूत्रसंचालन प्रा स्वप्नील भोसले यांनी तर आभारप्रदर्शन प्रा माणिक पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ.चित्रा पाटील , प्रा.डॉ.एस.बी.सावंत.प्रा.सुरेश कोळी,प्रा डॉ सचिन हडोळतिकर प्रा.व्ही एन पतंगे प्रा शरद पाटील, प्रा डॉ के. एस इंगळे प्रा सुरेखा पाटील,प्रा महेंद्र मिस्त्री , यश सूर्यवंशी, भिला पवार सुरेंद्र तांबे, मच्छिन्द्र जाधव, सतीश पाटील, उमेश माळी,संतोष महाजन व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
