राज्यस्तरीय "अ" गटात* *दुसऱ्या फेरीत चोपडा बस स्थानक नंबर "वन": आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील



राज्यस्तरीय "अ" गटात* *दुसऱ्या फेरीत चोपडा बस स्थानक नंबर "वन": आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील
♦️ चोपड्यात २१ ईलेक्ट्रीकल्स बसेस दाखल होणार

♦️सेल्फी पाँइंट तयार करणार

♦️ नव्या अन्य बसेस मिळणार

♦️ कर्तृत्ववान महिलांचा ईतिहासाचे फलक झळकणार
♦️ कारंजा व विविध पेंटिंगचे नियोजन

चोपडा दि.२६ (प्रतिनिधी )
हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर आगार अभियानांतर्गत दुसऱ्या सर्वेक्षणात चोपडा बस स्थानकाला 82 गुण मिळवून राज्यात प्रथम आले असून  लवकरच  २१  ईलेक्ट्रीकल्स बसेस  दाखल होऊन बसेसची कमतरता दूर केली जाणार आहे. इतकेच नव्हे लोकसहभागातून कारंजा , विविध पेंटिंग, कर्तृत्ववान महिलांचा ईतिहासाचे फलक  झळकवून आगार परिसर देखनीय  केला जात असून  आमदार सौ.लताताई सोनवणे व प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या अथक प्रयत्नांनी चोपडा आगार फायनल स्पर्धेतूनही राज्यातून प्रथम क्रमांक पटकावेल असा विश्वास  आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी आयोजित पत्र परिषदेत व्यक्त केला आहे.

.ते पुढे म्हणाले की, आता आपले बस स्थानक राज्यस्तरीय अ गटात प्रथम क्रमांकावर आलेले आहे . सहा फेऱ्यांमध्ये आपण जर प्रथम क्रमांक वर येत  राहिलो तर चोपडा डेपोला  50 लाख रुपयांचे रोख बक्षीस व ट्रॉफी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  मिळेल .  मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक हे अभियान एक मे 23 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत राबविले जात आहे. यासाठी मंत्रालयातून याकडे विशेष लक्ष दिले जात आहे .चोपडा बस स्थानकाला पहिल्या सर्वेक्षणात  77 गुण मिळालेले होते त्यावेळी औरंगाबाद येथील कमिटी आपल्या बस स्थानक पाहणीसाठी आलेली होती.आता दुसऱ्या सर्वेक्षणात जुलै ते सप्टेंबर यात 82 गुण धुळ्याच्या कमिटीने चोपडा बस स्थानकाला दिल्यानंतर राज्यात प्रथम क्रमांक चोपडा बस स्थानकाचा आलेला आहे. राज्यस्तरीय व प्रादेशिक असे दोन विभाग दिलेले आहेत त्यात चोपडा बस स्थानक राज्यस्तरीय विभागात अ क्रमांकाने दुसरा क्रमांक पटकाविल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे .
विभाग नियंत्रक भगवान जगलोर व विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी यांनी सर्वांनी तसेच चोपडा व स्थानकातील अधिकारी कर्मचारी कर्मचारी वाहक चालक यांनी सर्वांनी मेहनत घेतल्यामुळे दुसऱ्या फेरीपर्यंत चोपडा बस स्थानक राज्यात प्रथम क्रमांकावर आलेला आहे . असे ही महेंद्र पाटील यांनी स्पष्ट करून आमदार लताताई सोनवणे यांनी चोपडा बस स्थानकात संपूर्ण काँक्रिटीकरण करून दिल्याने व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हेही वारंवार सहकार्य करत असल्याने चोपडा बस स्थानक निश्चितच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविल्याशिवाय राहणार नाही  असा विश्वास आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.विमानतळावर दिशादर्शक फलक जसे असतात लवकरच लावले जातील तसेच आरो पाणी वाटप मशीन बसविले जाईल बसेस कमी पडत असल्याने    लवकरच इलेक्ट्रिक बस 21 गाड्या चोपडा बस स्थानकाला मिळणार तसेच बीएससीच्या बसेस सुद्धा महाराष्ट्र  संपूर्ण महाराष्ट्रात 2500 बसेस मंजूर केलेले असल्याने त्याही मिळवण्याच्या आपण प्रयत्न करणार आहोत तसेच इलेक्ट्रिक बस साठी टेंडर सुद्धा चोपडा बस स्थानकाला मिळालेले आहे चोपडा बस स्थानक परिसरात विविध प्रकारचे आकर्षक फलक व पेंटिंग करण्यात आली असल्याने तसेच अजून सेल्फी पॉईंट कारंजा व इतिहासातील महान महिलांचे कर्तुत्व आपण प्रत्यक्षात भिंतीवर साकरणार आहोत लोकसहभागातून अशा विविध पेंटिंग्स व विविध आकर्षक फलक चोपडा बस स्थानक तयार करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने