शिरपूरला आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन
शिरपूर दि.२६(प्रतिनिधी)शिरपूर येथे भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेना मार्फत निवेदन देण्यात आले .
निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी कोळी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी कोळी जमातींमध्ये मोडत असून तरी महाराष्ट्रात टोकरे कोळी,महादेव कोळी,मल्हार कोळी,ढोर कोळी हे अनुसूचित जमातींमध्ये असून परंतु आम्हाला जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी पासून फार लांब ठेवण्याचे कटकारस्थान रचले जात आहे म्हणून धुळे येथून आई एकवीरा मंदिरा पासून शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा मुंबई मंत्रालय येथे २८ तारखेला संघर्ष पदयात्रा हजारोंच्या संख्येने कोळी समाज बांधव आपल्या मागण्या घेऊन मंत्रालयावर धडकणार आहेत.पदयात्रेचे मुळ कारण म्हणजे आदिवासी कोळी समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केले आहे की आदिवासी कोळी समाजाचा एस टी प्रर्वगात समावेश आहे परंतु आम्हाला संविधानुसार न्याय मिळत नाही म्हणून आमच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी आज बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पवन सोनवणे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे नगरसेवक विनायक कोळी,संदिप कुंवर , राहुल ईशी ,ईशेंन्द्र ईशी, किरणं कोळी, दिपक बागुल, राहुल सावळे, मोहन कोळी ,प्रभाकर सोनवणे ,अजिंक्य शिरसाठ, रोहित सोनवणे, भूरा कोळी ,नागेश कोळी, आकाश कोळी, किशोर कोळी ,वाल्मिक कोळी ,छोटु कोळी, डोंगर कोळी ,महेश कोळी ,राकेश कोळी ,दिनेश मंडाले, गणेश कोळी, रणजित कोळी ,मनोज कोळी ,भिमराव ईशी तसेच कल्पना कोळी, भिला ईशी ,गुलाब निकुंभ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
