सामाजिक कार्यकर्ते आबा बाविस्कर यांनी रेल्वे माल धक्का हमाल माथाडी कामगारांची दिवाळी केली गोड
जळगाव दि.15(प्रतिनिधी महेश शिरसाठ): शहरात रेल्वे माल धक्का संघटना अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री,मुकेश ऊर्फ आबा रमेश बाविस्कर यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने रेल्वे माल धक्का हमाल माथाडी कामगार यांना मिठाई वाटप करून कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली.
यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन भाऊ सोनवणे, नगरसेवक शरद भाऊ तायडे, बन्सी आप्पा माळी,नगरसेवक किशोर रमेश बाविस्कर,नगरसेविका सौ, उज्वला किशोर बाविस्कर , बंटी भाई गवळी, विनोद भाऊ कोळी, सुरेंद्र सोनवणे,बाळा बाविस्कर,ललित मावळे,अक्षय भाचा,किरण तडवी, नरेंद्र मामा श्रावणे,छोटू नेवरे, रितेश बाविस्कर,गुणेश बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
