ऐतिहासिक विजय गडावर शिवप्रेमींनी दिवाळी निमित्त केले "गडपूजन"

 

ऐतिहासिक विजय गडावर शिवप्रेमींनी दिवाळी निमित्त केले "गडपूजन"


चोपडा दि.१५(प्रतिनिधी): चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या पण  दूर्लक्षित असलेल्या विजय गडावर दिवाळीचे औचित्य साधत शिवप्रेमीं स्वराज्य सैनिक,स्वराज्य निर्माण सेना व श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत गड पूजन कार्यक्रम करून तालुक्याच्या इतिहासाला उजाळा देत गडाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करून आहे.ऐतिहासिक पाने उलटविल्याने परिसरातील जनतेत गड विकासासाचे बीजं रूजविली गेलीत.

  चौगाव, ता. चोपडा, जि. जळगाव या  गावाच्या पायथ्याशी विजय गड हा किल्ला असल्याचे अनेकांना माहीतच नव्हते हे हेरून शिवप्रेमीं स्वराज्य सैनिक,स्वराज्य निर्माण सेना चोपडा, श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत विजय गडाची साफसफाई करून गडाचा इतिहास वाचायला सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून
दि. १२ नोहेंबर, २०२३ रविवार रोजी
विजयगड येथे दिवाळीनिमित्त गडपूजन मोहीम राबवण्यात आली . यासाठी स्वराज्य निर्माण सेनेचे स्वराज्य सैनिक हर्षल पाटील,नयन कोळी,बंटी पाटील,चेतन गाडीलोहार,रोहित पवार,महेंद्र,मानस, निखिल,विशाल,जयेश,राज,वृषभ व श्री शिवप्रतिष्ठान चे जिग्नेश लंखारे,संग्राम परदेशी आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने