पाडवा पहाटने केले रसिकांना मंत्रमुग्ध..प्रताप विद्या मंदिरात पाडवा पहाट संपन्न
चोपडा दि.१५(प्रतिनिधी) येथील प्रताप विद्या मंदिरात कलादालन विभागाच्या वतीने पाडवापहाटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस भावगीते,भक्तीगीते सादर करत कलाकारांनी उपस्थिताना खिळवून ठेवले.
यावेळी चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरीताई मयूर, हरताळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ विकास हरताळकर,विनीत हरताळकर, डॉ प्रविणकाका सप्तर्षी पुणे,प्रताप विद्या मंदिराचे माजी मुख्याध्यापक ए एन सोनवणे, अरुणा पाटील, डी व्ही याग्निक, आर आर शिंदे, नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ए ए ढबु, संगीत शिक्षक गुरुवर्य व्ही जी मयूर, विशारद सच्चिदानंद भारती, माजी पर्यवेक्षक डी आर परदेशी,माजी शिक्षक एम बी बारी,नगर वाचन मंदिराचे संचालक प्रभाकर महाजन, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक रजीश बालन, सी बी निकुंभ माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक वसंत नागपुरे, तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांमधील अनेक आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलादालन विभागातील प्रमुख संगीत शिक्षक प्रदीप कोळी, पी ए नागपुरे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांना तबल्यावर साथसंगत विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे,अमर संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, संगीतशिक्षक विजय पालीवाल यांची लाभली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील, एम डब्ल्यू पाटील, समन्वयक गोविंदभाई गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी कमलेश गायकवाड, एस पी वारडे,के पी सपकाळे,डी एस,पाटील,पी पी शिंदे, के पी पाटील,नितीन पाटील, आदींनी परिश्रम घेतले.प्रस्ताविक संगीतशिक्षक प्रदीप कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी केले.
