स्वराज्य निर्माण सेनेतर्फे शिव दिपोत्सव साजरा
चोपडा दि.१५(प्रतिनिधी)दरवर्षीप्राणे या वर्षी सुद्धा स्वराज्य निर्माण सेनेतर्फे शिवदिपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आज दिवाळी चा अखेरचा दिवस म्हणजेच भाऊबीज या दिवशी दीपोत्सवास चोपडा वासियांनी चांगला प्रतिसाद दिला,
आपल्या हिंदू धर्माचे सण ज्या राजांमुळे साजरे होतात त्या राजांना स्वराज्य सैनिकांनी पहिला दिवा लावून वसुबारस ला सुरुवात केली .. घरी तर प्रत्येक व्यक्ती दिवाळी साजरी करतात पण आपले स्वराज्य सैनिक ज्यांच्यामुळे हिंदू धर्म टिकून आहे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात..
दिवाळीत ७ दिवस चालणारा दिपउत्सवासाठी स्वराज्य सैनिक हर्षल पाटील,बंटी पाटील,नयन कोळी,चेतन गडीलोहर,रोहित पवार,महेंद्र मराठे,राज महाजन,जयेश सोनार,वृषभ पाटील,दीपक महाजन,कल्पेश पाटील,मयुर पाटील,सिद्धेश कोळी, पियुष पाटील,मानस खैयेरणार,साई,कृष्णा मराठे,धीरज साळुंखे,संकेत पाटील,राम पाटील,सनी पाटील,दिनेश जोशी,सूरज राजपूत,दर्शन सोनार,निखिल कोळी,गणेश कलाल,शनिराज पाटील, आदी कार्यकर्ते मेहनत घेतात. तसेच दर शनिवारी ठीक ७:०० वाजता शिववंदना*होणार आहे तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन*स्वराज्य निर्माण सेना चोपडा विभागाने केले आहे.
