सरपंचांनो ..! जात पात पक्ष न बघता विकासाचे ध्येय ठेवा..मी आपल्या सोबत - माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंची ग्वाही

 सरपंचांनो ..! जात, पात, पक्ष न बघता विकासाचे ध्येय ठेवा..मी आपल्या सोबत - माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची ग्वाही 

♦️ पश्चिम महाराष्ट्रातील विकसनशील गावांचा हेवा करा

♦️१२ ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी पाच लाखाचे निधी पत्र प्रदान 

♦️ कोणत्याही कागद वाचा, समजा मगच सही करा 


चोपडा (प्रतिनिधी)-- गावातील राजकारण फार कठीण असते ज्यांना शिव्या खाण्याची सवय असते तेच गावातल्या राजकारणात परांगत होऊ शकतात. गावातल्या राजकारणाने आपल्या जवळच्या भाऊबंदकिशी दुश्मनी वाढत असते परंतु भाऊबंदकीचे राजकारण सोडून पश्चिम महाराष्ट्र  गावांसारखा विकास गावांचा करावा.गावाच्या विकास डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी व विरोधकांमध्ये समन्वय असला पाहिजे प्रत्येक गावाला भरभरून निधी देण्याच्या आमचा प्रयत्न असतो. विकासकामे करतांना जात पात पक्ष बघत नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी  केले.आज दि १७ रोजी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सद्स्यांचा सत्कार बोथरा मंगल कार्यालयात ठेवण्यात आला होता त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार सौ.लताताई सोनवणे ह्यांनी भूषविले.यावेळी १२ ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच निवडुन आल्याने ह्या सर्व ग्रामपंचायतींना विकासकामासाठी पाच लाखाचे निधीचे पत्र देण्यात आले.

 यावेळी ते बोलताना पुढे म्हणाले की,आपणास संपुर्ण गावाने म्हणजेच लोकनियुक्त सरपंच पद दिलेले आहे.त्यामुळे कोणा बद्दल ही आकस बुद्धी ठेऊ नका आणि फक्त गावाच्या विकासाकडे लक्ष ठेवा सरपंचाचे नेमके काम ,अधिकार काय ते अगोदर समजुन घ्या. यासाठी रोज दोन तास ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडुन बसा आणि आणि कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करण्याआधी त्याला वाचून समजून घ्या मगच स्वाक्षरी करा असा सल्ला ही त्यांनी दिला. ग्रामपंचायतचे सरपंचांनी कायदा समजून घ्यावा अन्यथा कायदेशीर कारवाईत अडकून जाल तेव्हा कोणीही वाचवायला येत नाही त्यामुळे ग्रामपंचायतिचे कायद्याचे पुस्तक वाचा असे अनेक सल्ले लोकनियुक्त सरपंचाना दिले.  

याप्रसंगी संजय गांधी निराधार समिती सदस्य ए.के गंभीर सर,राजेंद्र पाटील,माजी उपसभापती एम व्ही पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील,ऍड. शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी  मंगलाताई पाटील, कल्पनाताई पाटील,प्रताप अण्णा पाटील,सूर्यभान पाटील,सुभाष साळुंखे,कैलास बाविस्कर,रावसाहेब पाटील,मेहमूद बागवान,इम्रान खाटीक,प्रकाश राजपूत, गोपाल पाटील,किरण देवराज तसेच नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने