कोळी समाजाचा एल्गार ..धुळे येथून मंत्रालयाकडे निघाला पायी मोर्चा .. जळगाव, बुलढाण्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी
धुळे दि.१७(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांच्या ज्वलंत असलेल्या जात प्रमाणपत्र समस्या सोडवण्यासाठी आज शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकविरा देवी मंदिर प्रांगणात आदिवासी कोळी बंधु-भगिनींना एकत्रित येत पायी संघर्ष मोर्चास पिवळे झेंडे घेऊन सुरूवात केली. यावेळी शानाभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है।" 'टोकरे कोळी जमातीचा विजय असो' , 'महर्षी वाल्मिकींचा विजय असो' घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी प्रस्थान केले.
धुळे ते मुंबई मंत्रालय पायी मोर्चा निघत असून जेष्ठ कार्यकर्ते गोविंद जाधव , से. नि. अतिरिक्त जिल्हाधिकारी सैंदाणे , से. नि. पोलीस अधिकारी भाऊराव बागुल, से. नि.प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी जमलेल्या बंधू-भगिनींना शासन प्रशासन मधील अधिकारी कसे अन्याय करित आहेत या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव महापालिकेचे उपमहापौर डॉ.अश्विनभाऊ सोनवणे,ईंजि.राहुल सोनवणे,अॕड.अमित सोनवणे, प्रकाश कोळी ऊर्फ खन्ना भाऊ, योगेश बाविस्कर, तुषार सैंदाणे,अन्ना कोळी, सचिन कोळी, अशोक बाविस्कर यांच्यासह जळगाव, बुलढाणा व धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
श्री शानाभाऊंच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून आदिवासी कोळी जमाती बांधवाचे प्रबोधन खेड्यापाड्यात करण्यात आले होते,म्हणून आज पायी मोर्चात जमात बांधवांनी प्रचंड संख्येने सहभाग नोंदविला आहे.
