अनवर्दे खुर्द व बुधगाव येथील स्मशानभूमी रस्त्याचे उद्घाटन आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते
चोपडा दि.७(प्रतिनिधी): तालुक्यातील अनवर्दे खु व बुधगाव येथे स्मशानभूमी रस्ता खडीकरण चे उद्घाटन सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा यांचे हस्ते संपन्न झाले.
अनवर्दे व बुधगाव येथे अनेक वर्षांपासून स्मशानभूमी च्या रस्त्याची अडचण निर्माण झाली होती.परंतु आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे यांच्या प्रयत्नामुळे आज रस्त्याची समस्या सुटल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करुन आभार मानले
यावेळी संगांयो सदस्या सौ मंगलाताई पाटील ,कृषी उत्पन्न बाजार सभापती नरेंद्र पाटील ,वेले विकासो. चेअरमन राजेंद्र पाटील , कृ.बा.स. संचालक रावसाहेब पाटील ,आदिवासी सेवक संजीव शिरसाठ ,संचालक किरण देवराज , संचालक विजय वाघ , पी.टी. एस. विद्यालय चेअरमन प्रविण साळुंखे, समन्वय समिती सदस्य कैलास बाविस्कर, माजी नगरसेवक प्रकाश राजपूत , अशोक जाधव,बुधगाव माजी सरपंच पंडित शिरसाठ ,ललित पाटील,भरत धनगर, रमणनाना रायसिंग, साहेबराव शिरसाठ, प्रल्हाद शिरसाठ, वासुदेव शिरसाठ, भाऊसाहेब पारे, कैलास शिरसाठ,संजय शिरसाठ,शालिक धनगर, रामदास सपकाळे, ताराचंद शिरसाठ,नत्थु बोरसे, जगदिश बोरसे, बळीराम भिल,विक्रम शिरसाठनंदलाल शिरसाठ , संजय पारे,लक्षमण बाविस्कर यांचे सह अनवर्दे, बुधगाव येथिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
