शिक्षणाचे खाजगिकरण देशाला विनाशा कडनेणार :- जयसिंग वाघ
---------------------------------------------------------
जळगाव,दि.७(प्रतिनिधी) :- सरकार शिक्षण या पायाभूत मूल्याचे खाजगिकरण करत आहे , शिक्षणाचा दर्जा कमी कमी करत आहे , बजेटमध्ये शिक्षणावर योग्य योजना आखत नाही सरकारचे हे धोरण देशाला विनाशाकड नेणारे असून तमाम बहुजन समाजास शिक्षणा पासून वंचित ठेवणारे आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .
शिक्षण बचाव जन आंदोलन समिति तर्फे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालया समोर ५ ऑक्टोबर रोजी आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते .संयोजक मुकुंद सपकाळे यांनी शासन आज ६२००० शासकीय शाळा खाजगी करु पाहत आहे , शासनाचे हे धोरण आम्ही कदापी यशस्वी होवू देणार नाही असे सांगितले . डॉ. करीम सालार यांनी शासनाच्या एकूणच शैक्षणिक धोरानावर जोरदार हल्ला केला व सरकारी शाळा पूर्ववत सुरु ठेवा असा सल्ला दिला .
प्रा. एस. एस. राणे , प्रा. दिलीप भारंबे , शिवराम पाटील , राजकिशोर गुप्ता , प्रा. व्ही. डी. पाटील , सुमित्र अहिरे , सलीम खान आदिंनि आपले मनोगत व्यक्त केले . या धरणे आंदोलनात शासन विरोधी घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या . शासनाने हा निर्णय मागं घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा निर्धार करण्यात आला . १२५ पेक्षा अधिक प्राध्यापक , शिक्षक , संस्थाचालक , विद्यर्थि , कार्यकर्ते हजर होते . दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले व या प्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली . धरणे आंदोलन यशस्वीते करिता विविध संघटना कार्यरत होत्या .
