आयुष्मान भव मेळाव्यात कुरवेल ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

 आयुष्मान भव मेळाव्यात कुरवेल ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

चोपडा दि.७(प्रतिनिधी)आज केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आयुष्यमान भव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ सचिन भायेकर तथा सहायक संचालक, कुष्ठरोग जळगांव-डॉ.जयवंत मोरे यांच्या आदेशानव्ये, आणितालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गर्शनाखाली,चहार्डी आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य वर्धीनी उपकेंद्र-कुरवेल उपकेंद्रात "माता, बाल आरोग्य, लसीकरण,पोषण सल्ला इत्यादी तपासणी,निदान,उपचार, संदर्भ सेवा, आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण" या आजच्या शिबिराच्या थीम नुसार.. आयुष्मान भव या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 

प्रसंगी चहार्डी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-डॉ.वसंत जाधव,जिल्हा पर्येंक्षक- विजय देशमुख, हे पर्यवेक्षण करीत आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी- डॉ.दिपक पाटील, आरोग्य सेवक-विशाल पांडे, यांनी गरोदर माता यांच्या रक्तातील हिमोग्लबीनचे प्रमाण, रक्तातील साखरेचे प्रमाण, उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात येत असुन,18 वर्षांवरील तथा 29 वर्षांवरील लाभार्थी यांचे देखील एनसीडी स्क्रिनिग द्वारा तपासणी करण्यात येत असून,बाधित असलेल्या लाभार्थ्यांना उपल्ब्धतेनुसार, आरोग्य तपासणी केली व औषोधोपचार देण्यात येत आहे,मेळाव्यासाठी आशा सेविका-सरला कोळी,रत्नज्योत बाविस्कर, छाया पाटील, जयश्री मोरे,  आदींनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने