वरगव्हाणचे डॉ. रुस्तमजी तडवी यांची शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत दमदार एंट्री

 

वरगव्हाणचे डॉ. रुस्तूमजी तडवी यांची  शेकडो कार्यकर्त्यांसह   वंचित बहुजन आघाडीत दमदार एंट्री

चोपडा,दि.७(प्रतिनिधी)तालुक्यातील वरगव्हाण गावाचे सुपुत्र  डॉ. रुस्तूमजी तडवी यांनी  ७००  कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत  नुकताच प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष  बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांचे  नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी ही दमदार एंट्री मारली.
आदिवासी ,ओबीसी, मुसलमान, दलित, या सर्वच वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असलेले बाळासाहेब आंबेडकर यांचे उल्लेखनीय कार्याने प्रभावित होऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी व वंचितांना न्याय  देण्यासाठी   तन-मन-धनाने  आपण सेवा बजावणार असल्याचे डॉ. तडवी म्हटले आहे.

यावेळी जळगाव जिल्हा प्रभारी रविकांत वाघ  यांनी डॉ. रुस्तमजी तडवी यांना त्यांच्या जवळपास ७०० कार्यकर्त्यांना वंचितचे मफलर गळ्यात देऊन प्रवेश दिला. याप्रसंगी जिल्हा महिला अध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराख, जिल्हा उपाध्यक्ष मिरा वानखेडे, वंचितचे जिल्हा नेते विनोद सोनवणे, तसेच दिनेश इखारे, भगवान  मेघे,
तायडे दादा, कामगार युनियनचे बालाजी पठारे आदी उपस्थित होते.या सोहळ्यात  मान्यवरांची  वरगव्हाण गावातून डोल-ताष्यांच्या गजरात हजारो गावकऱ्यांचे उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने