कामगार लाभार्थीकडून साहित्य पेटीसाठी पैसे उकळू नका अन्यथा बीआएस तर्फे आंदोलन
*जळगाव दि.५(प्रतिनिधी): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणारे "साहित्य पेटी "वाटप ठेकेदार व त्यांचे संबंधितांकडून लाभार्थ्यांची पैशांसाठी अडवणूक होत आहे.ती त्वरित थांबवावी अन्यथा कामगार कल्याणकारी मंडळ उपायुक्त यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू अशी मागणी बीआरएस च्या महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक सौ. कोमल बापूराव पाटील एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले कि, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील पेटी वाटप ठेकेदार व त्यांचे नोकरदार यांच्याकडून लाभार्थी कामगार यांच्याकडून 50 ते 60 रु. घेऊन साहित्य वाटपाची पेटी देत होते. परंतु आमचे पक्ष पदाधिकारी यांनी जाब विचारला असता उडवाउडवीचे उत्तरे देतात लाभार्थी कडे ओळखपत्र असुनही साहित्य (पेटी) देत नाही व पैसे दिले तर साहित्य (पेटी) दिली जाते तरी हा प्रकार ताबडतोब थांबवावा तसेच महिला कामगारांशी अरेरावीची अशलाघ्य भाषेत बोलणी करणाऱ्या ठेकेदारांच्या नोकराला कामावरून कमी करावे अन्यथा
जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सौ.पाटील यांनी दिला आहे.
