जिल्हा पथकाकडून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला तपासणी

 जिल्हा पथकाकडून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला तपासणी 


चोपडा..दि.८(प्रतिनिधी) दिनांक-७ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार,राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट करण्याकरिता,मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सयुक्तिकपणे,ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र यांची तपासणी करून औषधी, यंत्र सामुग्री  तसेच वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्धता असल्याबाबतची खातरजमा करणे, तथा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्थितीत आहेत याची खात्री करणे, विशेषतः नवजात अर्भक व बालके यांचे आरोग्य बाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे, आणि ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, प्राआकेंद्रे, उपकेंद्रे यांना नियमित पणे भेटी देऊन येणाऱ्या अडचणी,स्थानिक स्तरावर उपलब्ध निधीचा विनियोग दुर करण्याबाबत कार्यवाही साठी,तसेच सर्व रुग्णालय अंतर्गत स्वछता,साफ सफाई,परिसर स्वच्छता व स्वच्छ पिण्याचे पाणी याची दक्षता घेऊन त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी  मुख्यमंत्री महोदयांच्या सुचना असल्याने,.मु.का.अ.-अंकीत, सोबतच जिल्हा आरोग्य अधिकारी-डाॅ.सचिन भायेकर, व सहाय्यक संचालक कुष्ठरोग जळगांव-डाॅ.जयवंत मोरे साहेब यांनी चोपडा उपजिल्हा रूग्णालय येथे भेट देऊन कामकाजाची तपासणी केली.

मु.का.अ.- अंकित यांनी रुग्णालयात उपलब्ध औषधीसाठा, तातडीच्या औषधी खरेदी बाबत, आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयाअंतर्गत व परिसरातील स्वच्छता, अर्भक/बाल मृत्यु, मातामृत्यु, संस्थात्मक होत असलेल्या प्रसूति, NCD/सांसर्गिक व असांसर्गिक आजार,पिण्याचे पाणी, आदी सर्व बाबींचा त्यांनी सखोल पणे आढावा घेतला. त्याचप्रमाणे रुग्णालयातील काही उणीवा व त्रुटींची पूर्तता करणे संदर्भात आवश्यक अश्या सूचना देखील त्यांनी दिल्या.मु.का.अ.यांनी भेटीदरम्यान एकंदरीतपणे, रुग्णालयातील  कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले,तसेच प्रशासनामार्फत रूग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल, याबाबत त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी व अधिक्षकां सह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.लासुरकर यांनी मुकाअ-अंकित यांना, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, व सहाय्यक संचालक कुष्ठरोग जळगांव-डॉ.जयवंत मोरे यांना शाल आणि पुस्तक भेट देऊन सत्कार केला.सदर भेटी प्रसंगी... तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर, चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक-डॉ.सुरेश पाटील, वैद्यकीय अधिकारी-डॉ.पंकज पाटील, डॉ.सागर पाटील, डॉ.निलिमा देशमुख, डॉ.तृप्ती पाटील, डॉ.स्वप्ना पाटील, सर्व अधिकारि सोबतच.. जिल्हा पर्यवेक्षक-विजय देशमुख, तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर, दिलवरसिंग वडवी, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक-किशोर सेंदाणे, कमलेश बडगुजर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग, तथा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने