रेलच्या मारुती मंदिरात 50 हजार रुपायाची चोरी.. तिसऱ्यांदा प्रकार ; पोलीस तपास मात्र शून्य

 रेलच्या मारुती मंदिरात 50 हजार रुपायाची चोरी.. तिसऱ्यांदा प्रकार ; पोलीस तपास मात्र शून्य 

चोपडादि.८ ( प्रतिनिधी ) -- धरणगाव रोडवरील रेल मारुती मंदिरात 50 हजार रुपयांच्या पितळी वस्तू सह रोकड अज्ञात चोरानी चोरून नेले मागील काही दिवसात तीनदा चोरी झाली अजूनही पर्यंत एकहि चोरीचा तपास लागला नसल्याने मंदिर व्यस्थापक मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.

     सविस्तर असे की, धरणगाव रोडवरील रेल मारुती मंदिरावर  असलेले अम्प्लिफायर (१२-१३ हजार रु.) २ दानपेट्या तोडून त्यातील रोकड 2 ते 2;30 हजार रुपये लंपास करण्यात आली आहे

अज्ञात चोरट्यांनी मारुती मंदिरावरील मुर्ती जवळून एक (पितळी ३-४ किलो) किलोची  घंटा छोटे-मोठे पटे चोरीला गेले शनी मंदिरातील तेलाची धागर आणि पितळी पटा पोरीला गेली आहे. या दोघांचे वजन ७-८ किला आहे. तसेच मंदिराच्या बाजुच्या खोलीतील तांब्याचे पंचआरती ताट, २ मारोतीच्या गदा, तसेच पॅचीस,पार्ने इत्यादी किरकोळ वस्तू सुध्दा चोरीला गेल्या आहेत. तरी अशाप्रकारे एकुण अंदाजे पन्नास हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत.यापूर्वी सुदा मंदिरात ३ वेळा चोरी झालेल्या आहेत परंतु त्याची तक्रार देवून सुध्दा कोणताही तपास लागला नाही किंवा वस्तू मिळाल्या नाहीत.सखोल चौकशी करून चोरांना पकडण्यात यावे व मुद्देमाल मिळवून दयावा ही नम्र विनंती. तसेच चोरांचा पक्का बंदोबस्त करण्यात यावा तसेच जर शक्य होणार असेल तर आपल्या प्रयत्नातून जुनी बंद पडलेली पोलिस चौकी मंदिरा शेजारी पुर्ववत सुरु करण्यात यावी असे ही ट्रस्टी नमूद केले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने