प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांचे महाजन क्लासमध्ये मार्गदर्शन
चोपडा दि.८(प्रतिनिधी): आपल्या नाविन्यपूर्ण कलागुणांनी माणसाने पूर्ण असणे म्हणजे सृजनशिलता
होय. परंतू हा गुण टाकण्याचे जो कार्य करतो त्याला शिक्षक म्हणतात.सृजनशिलता ही विदयार्थ्यामध्ये लहानपणापासून येण्यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्न करीत असतो असे प्रतिपादन प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांनी येथे केले. ते महाजन इंग्लिश क्लासेसमध्ये आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
चोपडा येथील महाजन क्लासमध्ये दिपक महाजन सरांनी केला. इयत्ता १० वी च्या मुलांना स्पर्धा परिक्षेची तयारी कशी व केव्हा करावी यासाठी 'मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला त्यात चोपड्याचे प्रातांधिकारी श्री. एकनाथ बंगाळे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम या त्रिसुत्री बद्दल सांगितले. M.P.S.C परिक्षा ही सोपी व सहज पास होण्यासाठी विदयार्थ्यांना आपले ज्ञान कसे दुसऱ्या ज्ञानाशी' जोडावे हे उदाहरण दाखल स्पष्ट केले. परीक्षेबाबत अनाठायी भिती मुलांमध्ये असते तो न्यूनगंड काढून आपल्या ज्ञानाचा चांगला वापर या परिक्षेमध्ये करता येतो. असेही सांगितले.यावेळी दिपक सरांनी त्यांचा शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला . प्रसंगी विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.
