एशियाड मध्ये भारताचा डंका १०७ पदके..चोपड्याच्या महाजन बंधूंनी गाजवली आशिया खंडातील मैदाने..
चोपडा दि.८(प्रतिनिधी)एशियाड गेम्स 2023 मध्ये भारताने भरगच्च अनेक पदे पटकावून मानाचा तुरा रोवला असून त्यात चोपड्याच्या तेजस रवींद्र महाजन, कुलदीप रवींद्र महाजन या महाजन बंधूंनी जोरदार चमक दाखवू आपल्या गावाचे नाव झळकल्यने त्यांच्यावर अभिनंदनाची सरबत्ती होत आहे. या एशियाड गेम्स 2023 स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनीतब्बल 107 पदके पटकावत चौथ्या पायदान वर भारताची झलक दाखवली.शिवाय सुवर्णपदक २८,रजत पदक ३८कास्यपदक ४१, मिळवून चमकदार कामगिरी केल्याने भारताची मान उंचावली आहे.विशेष म्हणजे अनेक राज्यांतील खेड्यापाड्यातील हे खेळाडू असून त्यांची उत्तूंग कामगिरी सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद व भूषणावह अशी आहे. भारतीय खेळाडूंनी केलेले उत्कृष्ट प्रदर्शन हे संपूर्ण आशिया खंडात भारताचा झेंडा अभिमानाने फडकावत देशाच्या गौरव वाढवण्यात मोलाची कामगिरी सर्व खेळाडूंनी बजावली आहे
यात पंजाब, हरियाणा महाराष्ट्र ,आसाम ,पूर्वोत्तर राज्य, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, अशा अनेक राज्याच्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत पदके पटकावली आहेत तरकाही खेळाडुंचे पदक काही सेकंदांमध्ये हूकलेपरंतु त्यांनी निराश न होता यापेक्षा चांगले प्रदर्शन पुढील स्पर्धेत करावे अशी आशा देशवासीयांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे ह्या खेळाडूंमध्ये शेतकऱ्यांचा मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
चोपडा शहरातील महाजन बंधूंनी स्पर्धेत सहभागी घेऊन आपले नैपुण्य दाखवून विशेष कामगिरी बजावल्याने चोपडा वासीया तर्फे हृदयपूर्वक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
